नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
..बाप माझा..
बाप माझा दिसायचा ताठ खांबावाणी,
कोरीव चेहरा अन् ठोस होती वाणी.
मीश्या पिळदार नी डाक्यावर फेटा,
क्रोधात वाटे तो उसळलेल्या लाटा.
राज्या सर्ज्यालाही लागे दम जवा बाप नांगरी रान,
काळ्या मायेचा पुत्र शोभावा अस गडद त्याचा वाण.
दर वर्षी जड होई त्याची बैलगाडी,
धान्यान गच्च भरे वाड्यावरची म्हाडी.
पर काळाच्या मनी होत काही दुसर,
हीराऊन घेतल त्यान रान बापाच हसर.
शेतातली माती लागे जणु ती आहे खडक,
वीरून पायवाट बनली त्याची घट्ट सडक.
कुणास ठाऊक यंदा पाऊस कुठ भटकला ,
चीडुन त्याच्यावर बाप माझा बाभळीला लटकला.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने