Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी

बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी

आयुष्यभर संसारात "दिवे" नाही लावता आले,
मग आजच भरमसाठ पणत्या लावल्याने
असा कोणता प्रकाश पडणार आहे?
प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात "उजेड" नाही पाडता आला,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने
असा कोणता गगनचुंबी "उजेड" पडणार आहे?

लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका,
आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी
"बॅंकेच्या मालकीची" आहे.
तीची पूजा केली काय नाही काय,
तिलाही तसा काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
शिवाय
माझ्यावाचून लक्ष्मीचे तरी
कधी काही अडले आहे काय?

आणि तरीही मला
"लक्ष्मीपूजन" करावेसे वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे
आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची
भलतीच अ‍ॅलर्जी दिसतेय.

* * *
शेतकऱ्यांचा राजा बळीराजा
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव
साजरा करणे म्हणजे दिवाळी!
बरोबर?
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची"
पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
बरोबर??
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून
नव्या दमाने शेतीला लुटण्यासाठी
नव्याने शस्त्र पाजवत नवा संकल्प 
म्हणजे दिवाळी!!!
बरोबर???
एका दाण्याचे हजार दाणे झाल्यानंतर
त्यातून निर्माण होणारी बचत लुटून
त्यातूनच निर्माण होणाऱ्या
ऐश्वर्याचे ओंगळवाणे प्रदर्शन
म्हणजे दिवाळी
बरोबर????
शेतकर्‍याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही,
अशा सरकारी धोरणांच्या हिरिरीने अमलबजावणीसाठी
लक्ष्मीपुत्रांनी मांडलेले भव्यदिव्य प्रदर्शन म्हणजे दिवाळी!!!!
बरोबर?????
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न"
म्हणजे बलिप्रतिपदा 

शेतीच्या "दिवाळखोरीच्या उत्सव" 
म्हणजे दिवाळी
बरोबर??????

* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा
निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात
आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली
"फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *

कुठेतरी संपत्तीचे 
ऐश्वर्य उभे राहायला 
कुठेतरी गरिबीचा आणि 
दारिद्र्याचा खड्डा पडावा लागतो
म्हणून
इंडियाच्या शिरावर
समृद्धीचा डोंगर
भारताच्या उरावर
कर्जाचा डोंगर
म्हणून
इंडियात दिवाळी
आणि 
भारतात दिवाळखोरी

* * *
ईडा पीडा टळू दे 
बळीचे राज्य येऊ दे 
* * * 
गरिबीचा क्षय म्हणून 

गळफासाला अभय
भाजल्या कोंबडीला कुठे उरते 
विस्तवाचे भय?

तुमचे तुम्ही लावा दिवे
आणि करा आरास
आम्ही शोधतोय उकिरड्यावर
लेकरांसाठी घास

तसं हे आमचं बारमाही गार्‍हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!

- गंगाधर मुटे 'अभय'

*** **** **** **** **** ***

=====

Share