नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतामंदी राबणारा
शेतकरी बळीराजा
नाय जीवा चैन त्याच्या
कयी मिळेना हो रजा...!१!
म्हने लागला मिरूग
दिसं पेरणीचे आले
उरी उल्हास राजाले
बैलं जुपे आवताले....!२!
सर्जा राजा संगतीनं
काम करी बळीराजा
सदा ओढतो नांगर
माल पिकवतो ताजा....!३!
करी धरणीची सेवा
रोज घामाच्या धारानं
येई पिक उगवून
आसू दाटल्या थेंबानं....!४!
तोच काढतो कापूस
गाठ त्याच्या धोतराले
त्याले जगी नाही तोड
अन्न चारतो जगाले......!५!
तोच जगाचा पोशिंदा
उरे त्याच्यासाठी धांडा
तोच पेरतो जवारी
त्याले कोंड्याचाच मांडा...!६!
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने