Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




उठ शेतकऱ्या, घे मशाल

उठ शेतकऱ्या, घे मशाल

नमस्कार! शेतकरी बांधवांनो,

मी तुम्हाला एका दुष्काळग्रस्त शेतकर्याचे मनोगत सांगणार आहे. मी एक शेतकरी आहे. माझा व्यवसाय शेती आहे. हा माझा व्यवसाय माझ्यासाठी जीव घेणारा ठरला आहे. थोडी माझी कैफियत ऐकाल का? माझ्यासाठी थोडासा वेळ द्याल का?

माझा परिवार हा मोठा आहे. माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. शेतीत धान्य पिकले तरच आम्ही जगू शकतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. "देशाचा कणा" आहे. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीत मशागत करणाऱ्या शेतकऱ्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. आज पाऊस हा वेळेवर येत नाही, त्यामुळे शेतात पेरलेले बी उगवत नाही. सर्वत्र दुष्काळ पसरलेला आहे. कर्ज काढून घेतलेल्या बियाणांची कर्जफेड करायची कशी? बँकेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, हप्ता वसुली, हे सर्व कर्ज कसे फेडायचे? शेत कोरडे आहे, आम्ही जीवन कसे जगायचे? पावसाचा एकही थेंब येत नाही. दुष्काळामुळे घरांमध्ये बिकट अवस्था झाली आहे. मुलाबाळांचे शिक्षण करायचे आहे,जगायचे कसे हा प्रश्न सतत भेडसावत आहे. घरातील मुलांचे, बायकांचे हाल होत आहे. शेती हा आमचा व्यवसाय असल्यामुळे आमच्याकडे अन्य दुसरा मार्गही नाही.

दुष्काळी परिस्थिती उदभवल्यामुळे मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न कसे होणार? संसाराचा गाडा कसा चालणार? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर भेडसावत आहेत. या प्रश्नाच्या विळख्यातून मी कसा बाहेर पडणार? यातून मला मार्ग सापडत नाही. पैसे नसल्यामुळे कोणत्याही गरजा पूर्ण होत नाही. आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असते, मग त्या गरजा भागवण्यासाठी मी सावकार कडून कर्ज घेतो पण सावकार लोकही शेत गहाण ठेवल्याशिवाय कर्ज देत नाहीत. वर्षानुवर्ष अशी दुष्काळी परिस्थिती कायम राहिल्यामुळे कर्ज कधी आणि कसे फिटणार? थकलेल्या कर्जामुळे सावकार शेतीवर कब्जा करतो आणि कायद्याच्या साहाय्याने शेती ताब्यात घेतो. अशा बिकट प्रसंगी कायदासुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात जाऊन सावकाराचीच मदत करतो. जो पैसे देतो त्याच्या बाजूने कायदा झुकतो. अशावेळी माझ्या मनामध्ये एकच विचार येतो, तो म्हणजे स्वतःचे जीवन संपवण्याचा. मग मी आत्महत्या करण्याचा विचार करतो. पण एक विचार मुलाबाळांचाही येतो. माझी कोणी मदत करेल का?

पीक उगवत नाही, उगवले तर जगत नाही, जगले तर पिकत नाही आणि पिकलेच तर चांगले भाव मिळत नाही. सरकार भाव उतरण्यासाठी कायमच प्रयत्न करत असते. त्यामुळे आता सरकार वरूनही विश्वास उडला आहे, सरकारही हवेत गोळ्या मारत आहे. आता शांत बसून जमणार नाही. आता वेळ आहे निवडणुकांची. सारे पक्ष आमच्या दारात येऊन, आमच्या पाया पडून मतदानाची भीक मागतात, आम्ही तुम्हा शेतकऱ्यांसाठी खूप काही करू, म्हणतात हे करू, ते करू अशी आश्वासने देतात. कुणी जलसिंचन करू म्हणतात, तर कुणी तळे बांधू म्हणतात पण निवडून आल्यावर हे सर्व पक्ष म्हणतात की आज करू, उद्या करू असे म्हणत जलसिंचन तळे मात्र कधीच होत नाही. आता कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. आता वेळ आहे स्वतःला झिजवायची, स्वतःला सिद्ध करायची. सरकारकडून आपला हक्क मागायची. आता थांबायचे नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला मिळत नाही तोपर्यंत चालत राहायचे.

उठ शेतकऱ्या, घे मशाल
अन्यायाला जाळ खुशाल

एकच ध्यास शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विकास.

सरकारही काही करत नाही, शेतकऱ्याने कितीही आत्महत्या केल्या, कितीही जहर खाल्ले तरीही सरकार काहीच करत नाही. आता सरकारचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे ''आपलं घर आणि आपले नातेवाईक" त्यासोबतच आपली सत्ता कशी टिकून राहील एवढीच फक्त त्यांना काळजी असते, शेतकऱ्यांची बिलकुलही पर्वा नसते, म्हणून आता म्हणणे भाग पडत आहे कि......
शेतकऱ्याचे मरण हेच तर सरकारचे धोरण....

कु, कोमल राम भुजबळ
मु. आखातवाडा पो. रहाटगाव
ता. पैठण जि. औरंगाबाद
~~~~~~ ~~~~~~ ~~~~~~~
दिनांक : १८/०२/२०१९

शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण

आज पैठणला एक दहावीत शिकणारी मुलगी भेटली आणि तिने "शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण" या विषयावरचा एक छोटेखानी लेख माझ्या हातात ठेवला.

अँड्रॉइड फोन घरात नसल्याने तिला व्हाटसप, फेसबुक किंवा इंटरनेट बद्दल फारशी माहिती नाही.... त्यामुळे स्पर्धा संपन्न झाल्याचा अंदाज तिला आला नाही. आता स्पर्धेत भाग घ्यायचा तिचा उद्देश होता.

तिचे मन दुखवायचे नाही म्हणून तो लेख मी स्वीकारला व स्पर्धा संपली आहे असे काही सांगितले नाही.

शाळकरी मुलांना सुद्धा शेतीचे दुखणे, निदान व त्यावरील उपाय कळायला लागले, ही बाब मनाला सुखावून गेली.

आपल्या वाचनासाठी लेख इथे टाकत आहे.

- गंगाधर मुटे
~~~~ ~~~~ ~~~~ ~~~~

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनप्रकार : 
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
लेखनविभाग: 
अनुभवकथन
Share

प्रतिक्रिया