नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भुकेचा ऊठता डोंब
वासरचा हंबरडा फुटला
मेलेल्या गाईला पाहुन
जीव माझा तीळ तीळ तुटला
तरफडली ती
पोटात पडली आग
गाय माझी गेली
राहीला मागे तो माघ
न्हेताना तिला
थरथरला माझा हात
खुप केली दवा
पण नशिबाने सोडली साथ
पुरून तिला आलो
पण तुटली नव्हती माय
रिकाम्या दावणी कडे पहातां
खचली माझी काय
पुन्हा एकदा त्या वासराने
हंबरडा फोडला
मिठी त्याला मारता
आश्रु वरचा ताबा मात्र सुटला......
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५