Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका

logoपहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
स्थळ   : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा
 
           ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी,हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयचकोडेच आहे.
 
           गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेलीनाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारणसांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्याअनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणीकरून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला अत्यंत लाजिरवाणीच म्हटलीपाहिजे.
             कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी,मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीआणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आणि साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीवभरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटीबद्ध असणार्‍या लेखक – कवी - गझलकारांनी एकत्र येऊन अ. भा. मराठी शेतकरी साहित्यचळवळ स्थापन केली असून पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
स्थळ   : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा

कार्यक्रमाची रुपरेषा
शनिवार २८ फ़ेब्रुवारी २०१५

उदघाटन सोहळा : ११.००  ते  ०१.३०

संमेलनाचे अध्यक्ष :  मा. शरद जोशी
उदघाटक :  मा. इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ कवी
प्रमुख अतिथी :  मा. भीमराव पांचाळे, गझलनवाज, मा. संजय पानसे
स्वागताध्यक्ष :  सौ.सरोजताई काशीकर
प्रास्ताविक :  गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
सूत्रसंचालन :  प्रा. मनिषा रिठे
शेतकरी नमनगीत:  संगीतकार मा. सुधाकर आंबुसकर व  संच
पुस्तक प्रकाशन: “नागपुरी तडका” काव्यसंग्रह

मध्यावकाश :  स्नेहभोजन

परिसंवाद – १      वेळ : दुपारी ०३.०० ते सायं ०४.३०

विषय : शेतकरी चळवळीच्या उदयापूर्वीचे आणि नंतरचे मराठी साहित्य
अध्यक्ष: डॉ. शेषराव मोहिते
सहभाग: डॉ. दिलीप बिरुटे,  प्रा. डी. एन.  राऊत
सूत्रसंचालन: प्रा.  राजेन्द्र मुंढे

परिसंवाद – २    वेळ : सायं ०४.३० ते ०६.००

विषय : आत्महत्त्या करण्यापूर्वी एका शेतकर्‍याने लिहून ठेवलेल्या पत्राचे त्याच्या विधवा पत्नीद्वारा वाचन
अध्यक्ष: डॉ. मानवेंद्र काचोळे
प्रस्तावना: कडुआप्पा पाटील
सहभाग: अ‍ॅड सुभाष खडांगळे, रवी देवांग
सूत्रसंचालन: मधुसुदन हरणे

मध्यावकाश : चहा

परिसंवाद – ३   वेळ : सायं ०६.१५ ते ०७.३०

विषय : शेतकरी स्त्री आणि मराठी साहित्यविश्व
अध्यक्ष : विद्यूत भागवत
सहभाग : प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे
सूत्रसंचालन : गीता खांडेभराड

शेतकरी गझल मुशायरा
वेळ : सायं ०७.३०  ते रात्री ०९.००

अध्यक्ष:  मा. भीमराव पांचाळे, गझलनवाज
सहभाग: विनिता पाटील (डोंबिवली), मारोती पांडूरंग मानेमोड (नांदेड), निलेश कवडे (अकोला), राज पठाण (अंबाजोगाई), डॉ. कैलास गायकवाड (मुंबई) कमलाकर देसले (नाशिक) नजीम खान, प्रमोद चोबितकर (बुलढाणा), मसुद पटेल, आबेद शेख, गजानन वाघमारे, विनय मिरासे, (यवतमाळ), वीरेंद्र बेडसें,  विजय पाटील (धुळे), नितीन देशमुख, लक्ष्मण जेवणे, गिरिश खारकर, पवन नालट (अमरावती), सुमती वानखेडे, विजय राऊत, विनोद मोरांडे (नागपूर), रवी धारणे (चंद्रपूर), अनंत नांदुरकर, ललित सोनोने, दिलीप गायकवाड, गंगाधर मुटे (वर्धा)
सूत्रसंचालन : विद्यानंद हाडके आणि प्रफ़ुल भुजाडे

मध्यावकाश : स्नेहभोजन
सांस्कृतिक सत्र : रात्री ९.३०
श्रमशक्ती कलाअविष्कार औरंगाबाद द्वारा निर्मित एकांकिका
“उगवला नारायण”
* संहितालेखन : नवनाथ बंडू पवार       * दिग्दर्शन : गोपाळ पळसकर  
* संगीत : रवींद्र स्वामी                    * नेपथ्य :  मधुकर कुलकर्णी
* कलाकार : गोपाळ पळसकर, वैशाली, कुलकर्णी, नागनाथ काजळे, किशोरी नाईक,  बागेश्री सराफ

रविवार ०१ मार्च २०१५

परिसंवाद – ४  वेळ : सकाळी ०८.३०ते  १०.३०

विषय : शेतीसाहित्य आणि पत्रकारिता
अध्यक्ष: अनिल महात्मे, जेष्ठ पत्रकार
सहभाग: सुनिल कुहीकर, तरुण भारत, अविनाश दुधे, संपादक, पुण्यनगरी, अमरावती, राजेश राजोरे, संपादक देशोन्नती, बुलडाणा, श्रीपाद अपराजित, संपादक, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर
सूत्रसंचालन : प्रमोद काळबांडे, सहसंपादक, सकाळ, नागपूर
प्रकाशन: “सारस्वतांचा एल्गार” स्मरणिकेचे प्रकाशन

मध्यावकाश : अल्पोपहार

परिसंवाद – ५     वेळ : सकाळी ११.०० ते  दुपारी १२.३०

विषय : शेती आणि मराठी साहित्यविश्व
अध्यक्ष: भास्कर चंदणशिव
सहभाग: सुधाकर जाधव,  मुरली खैरनार
सूत्रसंचालन : गंगाधर मुटे

शेतकरी कवीसंमेलन      वेळ :  दुपारी १२.३०  ते  ०२.००

अध्यक्ष:  डॉ. विट्ठल वाघ
सहभाग: विनिता माने-पिसाळ, रविंद्र कामठे (पुणे), किशोरी नाईक, कौतुक शिरोडकर (मुंबई), डॉ संजीवनी तडेगावकर, प्रा. जयराम खेडेकर (जालना), दिलीप भोयर, विजय विल्हेकर, विश्वजित गुडधे, हनुमान बोबडे, प्रशांत वावगे, (अमरावती), नवनाथ पवार (औरंगाबाद), दिलीप चारठाणकर (परभणी), प्रा विट्ठल कुलट, मंगेश वानखडे,  प्रवीण हटकर (अकोला), दीपक चटप (चंद्रपूर), संजय इंगळे तिगांवकर, प्रा. मनिषा रिठे, डॉ. रविपाल भारशंकर, धिरज ताकसांडे (वर्धा), डॉ विशाल इंगोले (बुलढाणा), श्रीकांत धोटे (सिंधुदुर्ग), विजय चव्हाण (लातूर), दर्शन शहा (कर्नाटक), विजय सोसे, गजानन मते, चाफ़ेश्वर गांगवे (वाशिम)
सूत्रसंचालन : किशोर बळी

मध्यावकाश : स्नेहभोजन

समारोपीय सत्र   वेळ : दुपारी ०३.०० ते सायं ०५.३०

विषय : शेतकरी आत्महत्या, राजकारण आणि  साहित्यविश्व
अध्यक्ष: अ‍ॅड वामनराव  चटप
सहभाग: गुणवंत  पाटील हंगरगेकर, विजय निवल, राम नेवले, अ‍ॅड दिनेश शर्मा
 सूत्रसंचालन : संजय इंगळे तिगांवकर

पुरस्कार वितरण आणि बळीराजाची आरती

 
-------------
: निमंत्रण पत्रिका :

sahity sanmelan

------------
sahity sanmelan
 
 
 
 
Share

प्रतिक्रिया