Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन

akrawe shetkari sahity sammelan

sharad joshi
 
|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने || 
|| रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
|| लटकी-पुचाट वाणी | शिरजोर होत आहे
|| 
|| यावे रणात गच्ची | धरण्यास लेखणीने ||
 
कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी यांच्या ९१ व्या जयंतीदिनानिमित्त 

शेती अर्थ प्रबोधिनीचा उपक्रम
१५ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, ONLINE
दिनांक : गुरुवार, दि. ३ ते बुधवार, दि. ९ सप्टेंबर, २०२६ 
वेळ : दररोज रात्री ९.०० ते १०.०० 
Zoom Online : युट्यूब Live https://www.youtube.com/@chawdi

-=- कार्यक्रमपत्रिका -=-
 
        कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. ३ ते ९ सप्टेंबर, २०२६ रोजी सात दिवसीय १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन, आयोजित करण्यात आले आहे.
 
: कार्यक्रमाची रुपरेषा :
गुरुवार, दि. ३ सप्टेंबर, २०२६
 
: दुपारी १२.०० वाजता : 
दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, मराठी गौरवगीत
 
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
गायक :  विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे, ज्ञानेश पोहाणे 
 
संमेलनाध्यक्ष : मा. उपेंद्र महात्मे, नागपूर
उद्घाटक : मा. अनिलकुमार जवादे, हिंगणघाट
प्रमुख अतिथी : मा. डॉ. मनीषा रिठे, उपाध्यक्षा
विशेष अतिथी :  मा. प्रकाश गोटे, प्रगतिशील शेतकरी
कार्याध्यक्ष : मा. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
स्वागताध्यक्ष : सारंग दरणे, उद्योजक शेतकरी
सूत्रसंचालन : मा. नरेंद्र गंधारे, शेती साहित्यिक

: दुसरा दिवस :
 शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर, २०२
 
: रात्री ०९.०० ते १०.०० : 
 
: कविसंमेलन :
मा. राजेंद्र फंड (अहिल्यानगर)  - अध्यक्ष
मा. सुनील बावणे (चंद्रपुर)- सूत्रसंचालन
मा. रंगनाथ तालवटकर (वर्धा)
मा. गिरिधर काचोळे (वर्धा)
मा. निलेश बोबडे (वर्धा)
 
: तिसरा दिवस : 
शनिवार, दि. ५ सप्टेंबर, २०२
 
: रात्री ०९.०० ते १०.०० : 
: कविसंमेलन :
मा. मनीषा रिठे - वर्धा - अध्यक्ष
मा. खुशाल गुल्हाने अमरावती - सूत्रसंचालन
मा. उपेंद्र महात्मे - नागपूर
मा. संजय सोनार धुळे 
मा. नीरज आत्राम चंद्रपूर 
मा. साहेबराव तायडे - अकोला
 
: चवथा दिवस : 
रविवार, दि. ६ सप्टेंबर, २०२
 
: रात्री ०९.०० ते १०.०० :  
: गझल मुशायरा :
मा. आत्माराम जाधव - परभणी  - अध्यक्ष
मा. बाळासाहेब गिरी - नाशिक - सूत्रसंचालन
मा. नंदकिशोर दामोधरे अमरावती
मा. गंगाधर मुटे - वर्धा
मा. सुरेश सुरजुसे वर्धा
 
 : पाचवा दिवस :   
सोमवार, दि. ७ सप्टेंबर, २०२
 
: रात्री ०९.०० ते १०.०० : 
: कविसंमेलन :
मा. सुरेखा बोरकर - नागपूर - अध्यक्ष
मा. नरेंद्र गंधारे - वर्धा - सूत्रसंचालन
मा. माधुरी वरटकर वर्धा
मा. दशरथ धायगुडे सातारा 
मा. साईनाथ रहाटकर - नांदेड
 
: सहावा दिवस :   
मंगळवार, दि. ८ सप्टेंबर, २०२
 
: रात्री ०९.०० ते १०.०० :  
: काव्यवाचन :
मा. विद्याताई बोरुळकर - मुंबई- अध्यक्ष आणि सूत्रसंचालन
मा. विवेक मुटे - वर्धा
मा. ज्ञानेश पोहाणे - वर्धा
मा. स्वरा पोहाणे - वर्धा
मा. तेजस्विनी कोपरकर - वर्धा
 
: सातवा दिवस : 
बुधवार, दि. ९ सप्टेंबर, २०२
 
: रात्री ०९.०० ते १०.०० : 

: समरोपीय सत्र :

: काव्यगायन  :
मा. गिरिधर काचोळे - वर्धा
मा. गंगाधर मुटे - वर्धा
मा. नरेंद्र गंधारे - वर्धा
मा. सुनील बावणे - चंद्रपुर - सूत्रसंचालन

: समारोप :

अध्यक्ष : राजेंद्र फंड (अहिल्यानगर)
प्रमुख अतिथी : मा. श्री. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
विशेष अतिथि : मा. दिलीप भोयर, जेष्ठ शेतकरी कृतिशील साहित्यिक

 

             आपला स्नेहांकित 
                गंगाधर मुटे
                 कार्याध्यक्ष
१५ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन,Online

=`=`=`=`=`=.

Share

प्रतिक्रिया

  • संपादक's picture
    संपादक
    रवी, 06/09/2026 - 12:26. वाजता प्रकाशित केले.
    १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन.
    शेतीव्यवसायाच्या समस्यांच्या कारणांचे अभ्यासक साहित्यिकांनी बनावे- संमेलनाध्यक्ष डॉ. उपेंद्र महात्मे
    युगात्मा शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीचे औचित्य साधून १५ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेती अर्थ प्रबोधिनी द्वारे ॲग्रिसन क्लिनिंग, ट्रेडिंग अँड प्रोसेसिंग प्लांट, छोटी आर्वी, तहसील हिंगणघाट येथे घेण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास ॲग्रीसन प्लांटचे डायरेक्टर गंगाधर मुटे आयोजक म्हणून तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. उपेंद्र महात्मे, उद्घाटक अनिल जवादे, विशेष अतिथी प्रकाश गोटे, प्रमुख अतिथी प्रवीण अडेकर, स्वागताध्यक्ष सारंग दरणे यांनी उपस्थिती दर्शविली. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन नरेंद्र गंधारे यांनी केले. भारतीय अर्थकारणामध्ये शेती व्यवसायाचा मोलाचा वाटा असून याकडे शासन व्यवस्थेने प्रभावीपणे लक्ष देण्याची गरज आहे असे उद्घाटक अनिलजी जवादे यांनी प्रतिपादन केले. शेतकरी साहित्य संमेलन आणि शेतकरी संघटना या दोहोंमधला मूलभूत फरक तसेच साम्य यावर आयोजक गंगाधर मुटे यांनी प्रकाश टाकून याविषयी साहित्यिकांनी पथ्य पाळले पाहिजे असे प्रतिपादन केले. 
     
    आता तयार व्हावे, लढण्यास लेखणीने I
    रक्षण अबोलतेचे, करण्यास लेखणीने I
    लटकी- पुचाट वाणी, शिरजोर होत आहे I
    यावे रणात गच्ची, धरण्यास लेखणीने II
     
    वरील ओळींचे सार्थक व्हावे म्हणून शेतकऱ्यांविषयीच्या कथा, व्यथा, व्यवस्था, अवस्था याऐवजी शेती व्यवसायाच्या समस्यांची गुपित कारणे आणि समस्या निर्मूलनासाठी उपाय यावर साहित्यिकांनी अभ्यासक म्हणून आपल्या लेखणीची धार वाढवावी असे वक्तव्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर उपेंद्र महात्मे यांनी केले. याप्रसंगी सुरुवातीस विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे, ज्ञानेश पोहाणे या गायक चमूंनी सुंदर असे शेतकरी नमनगीत आणि मराठी गौरवगीत सादर केले. हे संमेलन 3 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर च्या दरम्यान कवीसंमेलन, गझलमुशायरा, काव्यवाचन, काव्यगायन याद्वारे आभासी पद्धतीने घेण्यात येत आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र फंड, डाॅ. मनीषा रिठे, आत्माराम जाधव, सुरेखा बोरकर क्रमशः प्रतीदिवशी राहतील तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी क्रमशः प्रतिदिवशी सुनील बावणे, खुशाल गुल्हाने, बाळासाहेब गिरी, नरेंद्र गंधारे यांच्याकडे देण्यात आली आहे. काव्यवाचनाकरिता अध्यक्ष आणि सूत्रसंचालनाची दुहेरी जबाबदारी श्रीमती विद्याताई बोरुळकर, मुंबई यांच्याकडे देण्यात आली आहे. या सात दिवसीय संमेलनाच्या समारोपीय सत्रास अध्यक्षस्थानी राजेंद्र फंड, अहिल्यानगर तसेच प्रमुख अतिथी ऍडव्होकेट सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट आणि विशेष अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे कृतिशील साहित्यिक दिलीप भोयर हे सर्व प्रमुख्याने हजर राहतील. हे आभासी संमेलन होऊ घातलेल्या १६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची नांदी आहे. या अगोदर झालेल्या एकूण 14 अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे श्रेय ॲग्रीसन क्लिनिंग, ट्रेडिंग अँड प्रोसेसिंग प्लांटचे डायरेक्टर गंगाधर मुटे यांना नक्कीच जाते.

  • पाने