नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

रे नववर्षा

गंगाधर मुटे's picture
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

रे नववर्षा

रे नववर्षा ये नेमाने
वल्हवीत अंकुर नवजोमाने
एक कवडसा चैतन्याचा
जा फुलवीत ही उदास राने ....!

ना अस्त्राने वा शस्त्राने
उकलन व्हावी सद्भभावाने
मत्सर-हेका ना गर्जन-केका
बाहुबलीचे नको भुजाने .....!

दानवाने ना देवाने
राज्य करावे बळीराजाने
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!

रे नववर्षा दे अभयाने
दे भरुनी दुरडी भगोणे
वित्तपातल्या लक्तरांना
भरव मुक्तीचे चार दाणे ...!

- गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................

Share

Comments

  • Raosaheb Jadhav's picture
    Raosaheb Jadhav
    Tue, 01/01/2019 - 06:23. वाजता प्रकाशित केले.

    छान!

    रावसाहेब जाधव (चांदवड)


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 01/01/2019 - 09:51. वाजता प्रकाशित केले.

    धन्यवाद सर!

    शेतकरी तितुका एक एक!


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 31/12/2019 - 11:32. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी तितुका एक एक!


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Thu, 31/12/2020 - 19:27. वाजता प्रकाशित केले.

    वर्षामागून वर्ष बदलत जातायत. कॅलेंडर बदलतायत. सरकारे बदलतायत. ११ वर्षात पक्ष बदललेत, नेते बदललेत, पंतप्रधान,...

    Posted by Gangadhar Mute on Thursday, December 31, 2020

    शेतकरी तितुका एक एक!


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Thu, 31/12/2020 - 19:34. वाजता प्रकाशित केले.

    बळीराजा

    शेतकरी तितुका एक एक!


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sun, 31/12/2023 - 10:15. वाजता प्रकाशित केले.

    नववर्षाच्या हिरव्याकंच आभाळभर हार्दिक शुभेच्छा *bqs*

    शेतकरी तितुका एक एक!


  • admin's picture
    admin
    Mon, 01/01/2024 - 04:58. वाजता प्रकाशित केले.

    महागडी, ब्रँडेड, इम्पोर्टेड दारू पिऊनही मास्तरची मास्तरकी, साहेबांची साहेबकी, व्यापाऱ्यांची व्यापारकी, उद्योजकांची उद्योजककी, पुढाऱ्यांची पुढारकी गेलेली नाही...
    मग
    सडकी, गावरान, गावठी, सस्ती दारू पिल्याने पाटलांची पाटीलकी कशी जाईल?

    ज्याच्यात हिम्मत असेल त्यांनी मला यामागील अर्थशास्त्र आणि तर्कशास्त्र समजून सांगावे.
    अन्यथा
    मान्य करावे की पाटलांची पाटीलकी दारूमुळे नव्हे तर सरकारच्या शेतीच्या लुटीच्या धोरणामुळे गेलेली आहे.

    "दारूमुळे पाटलांची पाटीलकी गेली" असा विचार डोक्यात येणे हे वैचारिक दारिद्र्य आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक दारिद्र्य संपेल तेव्हा संपेल.... पण वैचारिक दारिद्र्य तरी सरत्या वर्षासोबत संपून प्रत्येकात... विशेषत: प्रत्येक शेतकरीपुत्रात निदान नव्या वर्षात तरी वैचारिक श्रीमंती यावी यासाठी......

    सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    - गंगाधर मुटे


Layout Settings