Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन....

प्रती,
श्री. गंगाधर मुटे,
कार्याध्यक्ष
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन,

नमस्कार,

           दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे. सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा हा अभिप्राय सर्वांपर्यंत पोहचवावा ही अपेक्षा. हा सलग दुसरा साहित्य सोहळा म्हणजे शेतकरीवर्गासाठी व सर्वसामन्य माणसासाठी शेतकरी साहित्याची एक पर्वणीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
          जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ पत्रकार आणि शेतीतज्ञ ह्यांची अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि उद्घाटक लाभणे ह्यातच ह्या संमेलनाचे यश दिसून येते. मान्यवरांनी ह्या निमित्ताने मांडलेले विचार अतिशय प्रगल्भ होते व सर्वसामन्य माणसाला विचार करायला लावणारे तर होतेच तसेच अतिशय मार्गदर्शक असे होते.

          ह्या संमेलनात – आपण प्रकाशित केलेली पुस्तके – मा. शरद जोशी विशेषांक “शेतकऱ्यांचा सूर्य”, गंगाधर मुटे लिखित काव्यसंग्रह – “नागपुरी तडका”, व प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह – “कणसातील माणसं”, हे सर्वसामान्य माणसासाठी साहित्यक मेजवानीच म्हणावे लागेल. शेतकरी साहित्य चळवळीच्या अथक परिश्रमाचे झालेले हे चीजच आहे. संमेलनाचे बोधचिन्ह – नांगराच्या फाळाला लावलेली लेखणी त्याचेच हे फलित आहे असे मला जाणवले.

          ह्या संमेलनाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आपण आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद हे होत. उदा. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण | मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव | शेतकरी आत्महत्या; कारणे व उपाय | शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून | शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान. सर्वच परिसंवाद उल्लेखनीय झाले. वक्ते, विचारवंत तसेच त्या त्या विषयातील तज्ञांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, सरकारचे धोरण, निसर्गाचे कालचक्र, शेतकऱ्यांचे अर्थकारण, त्यावर चालणारे राजकारण, विविध कारणे मीमांसा, उपाय व सर्वात कळीचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्यावर झालेली चर्चा अगदी संयुक्तिक तर होतीच पण मार्गदर्शक होती व पुढील वाटचालीस प्रेरक अशीच होती.

          शेतीकरी गझल मुशायरा आणि शेतीकरी कवी संमेलन ... हा प्रयोग म्हणजे मनोरंजांतून विचार मंथन असाच वाटला. एका पेक्षा एक उत्तोमोत्तम गझलांचे व कवितांचे सादरीकरण, शेतकरी ह्या विषयवरील साहित्याने घेतलेली दखल खूप काही सांगून जाते. प्रचलित कवी आणि नवोदित कवी ह्याची अतिशय उत्तम सांगड आपण ह्या निमित्ताने घालून एक नवीन पायंडा घालून दिलात त्यासाठी आपले आभार. भविष्यात शेतकरी दुर्लक्षित राहणार नाही ह्याची ग्वाही ही कवी मंडळी देऊन जातात, कारण आजवरचा सिद्धांत आहे की काव्यात जी ताकद आहे ती कुढल्याही शस्त्रात नाही.

          “तुला कसला नवरा हवा” ही नाटिका तर मनोरंजांतून उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, त्यांच्यावर चाललेले राजकारण आणि शेतकऱ्यांच्या भावी पिढ्यांच्या मनातली तळमळ ज्या प्रगल्भतेने व्यक्त केली गेली त्या सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि लेखाचे मन:पूर्वक अभिनंदन. एक अभिनव असा हा प्रयोग. अतिशय संयुंक्तिक वातावरणात आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक आणि आभार.

          आपण मला ह्या संमेलनास आमंत्रित करून जो काही मान-सन्मान दिलात, तसेच मला शेतकरी कवी संमेलनात माझी “हक्क जगण्याचे वंचित होते” ही कविता सादर करण्याची संधी व त्या कवितेस आंतरजाल स्पर्धेत – पद्यकविता सदरात –मानपत्र देऊन पुरस्कृत केलेत आणि माझ्या सहा कविता आपण “कणसातील माणसं, ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करून मला साहित्यिक प्रतिष्ठा देऊन उपकृत केलेत, ह्या साठी मी आपला खूप खूप आभारी व ऋणी आहे.

          मला स्वत:ला हे संमेलन खूप काही देऊन आणि शिकवून गेले. खूप सारे शेतकरी, साहित्यिक आणि कवी मित्र मिळाले व शेतकरी साहित्य चळवळीशी स्नेह्बद्ध होऊन धन्य जाहलो.

          खासकरून मुटेसर मला तुमचा खूप अभिमान आहे. मी तुमचे फार कौतुक करतो आहे असे वाटेल पण त्याला इलाज नाही. तुमच्या सारख्या एक शेतकऱ्याने अशी एक साहित्य चळवळ चालवावी आणि भल्या भल्यांना तोंडात बोटे घालयला लावेल अशी त्याची योजना, आखणी, नियोजन व संमेलन, सलग दुसऱ्यांदा घडवून सहज यशस्वी करून दाखवावे ह्याला तोड नाही. निंदक तर असावेतच पण समर्थकही असले की पुढील कार्यास नवे बळ आणि प्रोत्छान मिळते असे मला वाटते. दोन दिवस फक्त शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे विषय आजवर आयुष्यात कधी अनुभवलेच नव्हते, ते ह्या शेतकरी साहित्य संमेलनामुळे अनुभवले आणि कृतकृत्य झालो. जसा आपला एक घास सीमेवरील जवानांसाठी अडतो तसाच आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठीही अडला पाहिजे ह्याची जाणीव प्रकर्षाने आज मला झाली. हीच ह्या संमेलनाची फलश्रुती आहे.

          शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील वाटचालीस माझ्या अनंत शुभेछ्या.


रविंद्र कामठे, पुणे.
भ्रमणध्वनी +९८२२४०४३३३०
Share

प्रतिक्रिया

  • संपादक's picture
    संपादक
    सोम, 04/07/2016 - 09:10. वाजता प्रकाशित केले.

    शासनाचे २५-२५ लाखाचे अनुदान घेवून अखिल भारतीय साहित्य संमेलन होतात, तेथे सर्व सामान्य रसिकांचे काय हाल होतात हे मी सासवडच्या साहित्य संमेलनात अनुभवलं आहे. जगाचा पोशिंदा म्हणून गौरव झालेला माझा शेतकरी राजाबद्दल चकार शब्द पण काढला जात नाही त्या संमेलनात, म्हणून कि काय आमचे परममित्र श्री.गंगाधरजी मुटे नी वर्धा येथे पहिले अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन मागील वर्षापासून घेतले व या वर्षी दुसरे अखिल भारतीय साहित्य संमेलन नागपूर येथे घेतले.
    सुंदर नियोजन, शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी, निवास व्यवस्था आमदार निवासात, आधी सांगितले कॉमन हाल राहील म्हणून पण नन्तर प्रत्तेक २ ते ३ मानस मिळून एक रूम. जेवण तर इतक सुंदर अगदी घरच्या सारख. पुन्हा प्रत्तेकाची विचारपूस. जेवले कि नाही?
    मुशायरा पासून ते परीसवांद अतिशय सुंदर व कळस केला तो कवीसम्मेलनाने. किती सुंदर! शब्द नाहीत.

    "एक आणखी झाडावरती लटकून मेला काल...तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल"

    हि गंगाधर मुटे साहेबांच्या कवितेला तर अक्ख्या सभागृहाने डोक्यावर घेतले तर या कवितेची दखल खुद्द ए.बी.पी.माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी घेतली.
    एकूण काय तर संमेलन कसे असावे हे अखिल भारतीय साहित्य संमेलनवाल्यांनी मुटे साहेबांकडून शिकावे इतक सुंदर.

    मुटे साहेब त्रिवार अभिनंदन तुम्हाला व तुमच्या खांद्याला खांदा लावून जीवापाड मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना...!

    - विजय पाटील
    नंदूरबार - ४२५४१२