पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
तू तसा - मी असा
नाकीतोंडी माश्या गेल्यात, मी मात्र मख्ख माझी अवस्था पाहून, तू खिदळलास चक्क
मोगल आले तेव्हा, मी अगदी स्वस्थ लाळ घोटायचा खुलेआम, तू मात्र मस्त
इंग्रज आले तेव्हा, मी झोपलो गाढ चापलुशित तुझ्या, बरीच झाली वाढ
डोंगरमाथ्याहून शिवाजी, घालत होता साद मला फ़ुरसत नव्हती, तुला फ़ितुरीचा नाद
फ़ाशी चढताना भगतसिंग, स्वप्न पाहत होता मला प्रपंचाची ओढ, तू टाळ्या वाजवीत होता
आता उजाडेल,मग उजाडेल "अभय" कधीतरी उजाडेल? की..... तू तसा-मी असा, म्हणून उजाडणेही बुजाडेल?
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.