पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
अंगार चित्तवेधी
दे तू मनास माझ्या आकार चित्तवेधी नजरेत गुंतणारा आजार चित्तवेधी
ती बोलली तरी का शब्दास नाद येतो? त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी
नाहीच राग येतो, वाटे हवाहवासा कानास पीळणारा फ़णकार चित्तवेधी
आभाळ गाठण्याची वेलीस हौस आहे मिळतो कधीकधी तो आधार चित्तवेधी
दु:खास मांडणारे बाजार फ़ार झाले दु:ख्खा खरीदणारा बाजार चित्तवेधी
आप्तास कौतुकाचा वर्षाव ही प्रथाची इतरांस गौरवे तो आचार चित्तवेधी
आगीत खेळतांना, सूर्यास छेडतो मी कोळून पी ’अभय’ तो अंगार चित्तवेधी
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.