पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
हिशेबाची माय मेली?
कशी झोपडी हीच अंधारलेली? कुण्या उंदराने दिवावात नेली?
पुजारी पुसे एकमेकांस आता नटी कोणती आज नावाजलेली?
तिला घाबरावे असे काय आहे अशी काय ती तोफ़ लागून गेली?
किती नाडती आडदांडे तराजू कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?
कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी कशी दरवळावीत चंपा चमेली?
म्हणाले 'अभय' 'ते' तुरुंगात डांबू ''जरी आमुची तूच तक्रार केली..!''
गंगाधर मुटे ................................................... (वृत्त - भुजंगप्रयात ) ....................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.