नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुष्काळ...
नभा नभा बरसावे आता
व्यथा भळाळली ह्रिदयाची
घुमे तलवार दुष्काळाची !!
सुकूनी गेल्या झाडे न वेली
आसवे विरली डोळ्यातली
दडली खोल काया पाण्याची !!
जीवन सारे व्याकूळ झाले
पशु पक्षी ते रक्तात न्हाले
कशी भरु खळगी पोटाची !!
दिले आकार न मानवाची
मूर्ति बनली अचेतनेची
कुणी राखे ना वेळ भुकेची !!
माझे सुर सारे भेसूरले
नाही मोकळे मार्ग उरले
आता पाहतो वाट मृत्युची !!
- निलेश संगिता अनंत उजाळ.
{७०४५३९८५६१}
प्रतिक्रिया
छान
आत्म्याची तळमळ म्हणजे कविता
कधी कधी ती मुकी मुक्यानेच जाते
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने