नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शबरी
शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी;
चिलीपिली तिच्याभवती गोंगाट करत भारी .
टोपलीमधल्या बोरांची चव असे न्यारी;
म्हातारीला बघून आठवे रामाची शबरी .
जशी जशी भवताली पोरं होत गोळा;
तसतसा हरखुन जाई तिचा जीव भोळा .
‘चार आण्याला मूठभर’ भाव होता रास्त;
विकत घेण्यापेक्षा पोरं चाखून बघत जास्त!
कुणीतरी सांगे ‘तिचा परदेशात असतो लेक;
दर महिन्याला पाठवतो दहा हजारांचा चेक !’
गुरुजींनी विचारलं एकदा ठरवून काहीतरी;
‘बोरं का विकता? रग्गड पैसा आहे ना घरी ?’
हताश हसून ती म्हणाली ‘काय सांगू लेकरा तुला;
गोजिरवाणा एक नातू बी आहे परदेशात मला...
...पण अजून तरी मी त्याला पाह्यलेलं नाही;
माझ्या हातचं बोर त्यानं चाखलेलं नाही.
...म्हणुन मी शाळेपुढं बोरं विकते अशी;
न पाह्यलेल्या नातवाला शाळेतच शोधते जशी !’
म्हातारीच्या ममतेचा चेक सांगा कधी वठेेल...?
बोर रानातील वाळली! तिला नातू कधी भेटेल ?
-* किरण शिवहर डोंगरदिवे, समता नगर मेहकर, ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301 मोबा 7588565576
& 7057465576
प्रतिक्रिया
शबरी
आज गावागावातून मोजक्याच का होईना पण शेतकऱ्याची काही मुलं शहरात किंवा प्रसंगी परदेशातही स्थायिक झाली आहेत. ह्यात कधी कधी सुख शोधताना एखादं अनोळखी दुःख समोर येत ते व्यक्त करताना कधी कधी साध्या शब्दातून ते मांडता येत त्याचा हा एक प्रयत्न
किरण शिवहर डोंगरदिवे
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने