सांग तुकोराया : अभंग ।।१५।।
ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती ॥३॥
माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । पोशिंद्याची ॥६॥
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
पंधरा/सात/दोन हजार सोळा
=÷=÷=÷=÷=
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0FYJgUAYvcaPjLWSCmEkjU...
पाने