![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेती आणि माती
शेती......
शेती करता करता केंव्हा आयुष्याची माती झाली कळालेच नाही.....
कारण शेतीलाच माती अन मातीलाच शेती समजत आलो आजवर आम्ही
कळाला जेंव्हा शेतीतला अन मातीतला फरक
तेंव्हा
शेती गहाण होती सावकाराकडं
अन
माती शासनाकडं.... संशोधनासाठी
शेती उदरनिर्वाहाचे साधन असो वा नसो शेतकऱ्यासाठी
पण
पण राजकारण्यांसाठी नक्कीच असतो..... ज्वलंत विषय
योजना अन सबसिडी च्या ओझ्याखाली दबत चालली शेती
यामुळे मालाला भाव मागताना सुद्धा
श्वास गुदमरतो आहे आमचा
किसान सन्मान योजनेचा दोन हजाराचा मॅसेज मोबाईलवर आला की
विसरून जातो आम्ही बेभाव होणारा
मालाचा लिलाव......
आम्हीही होतो सामील हातात रुमने घेऊन
दरवर्षी मोर्चे आंदोलनात....
पण शासनाच्या धोरणापुढे
गळून पडते हातातल्या रुमण्याची पाचर
तेंव्हा कळते की आता शेती
फक्त माती पुरती मर्यादित राहिली नाही...
शेती कागदाची झाली आहे,
शेती राजकीय झाली आहे,
पुढाऱ्यांची कॉलर झाली आहे शेती
लाल दिव्याची ताकद झाली आहे शेती
तर कुणाच्या....
कागदावरची शाई झाली आहे शेती
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
लेखन विषयाशी संबंधित आहे असे
लेखन विषयाशी संबंधित आहे असे वाटते, त्यामुळे पुन्हा एकदा पुनर्विचार व्हावा
शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले
शेतकऱ्याला बळीराजा असे म्हटले जाते. शेतकरी म्हणजेच बळीराजा.
बळीराजा म्हणजेच शेतकरी.
पण
स्पर्धेचा विषय "शेतकरी राजा बळीराजा" असा नसून थेट "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" असा आहे. त्यामुळे शेतीशी किंवा शेतकऱ्याची संबंधित रचना असली तरी ती विषयानुरूप आहे असे म्हणता येत नाही.
इतिहासात किंवा पौराणिक वाङ्मयात ज्या वामनकालीन बळीराजाचा उल्लेख झाला आहे, ज्या बळीराजाला वामनाने पाताळात गाडले अशी आख्यायिका आहे... त्या पुरातन काळातील राजाला "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" असे मानले जाते.
सबब, त्या पौराणिक बळीराजाचा उल्लेख असल्याशिवाय किंवा तत्कालीन काही संदर्भ असल्याशिवाय रचना विषयानुरूप आहे असे म्हणता येत नाही.
पाने