![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी गीत
शीर्षक:-रास
पीक आलं बहरत कणीस भरलं टपोरं
हाती गोफण घेऊन गंगू तू पाखरं //धृ//
रानात मचांगी बसून मी करतो राखण
रान बघ हिरवंगार कसं दिसती देखणं
पिवळं कणीस बांधलंय हळदीचं काकण
हाती गोफण घेऊन गंगू तू हाकल पाखर //१//
पक्षी करती किलबिल बसूनी कणीसावर
आनंदाने उडत दाणे खाती पोटभर
आले दिस सुगीचे जणू सोन्याची घागर
हाती गोफण घेऊन गंगू तू हाकल पाखरं //२//
रानी सळसळ पानांची कानी मधुर नाद
राणी ऐकून सारे मनास होई मोद
सजवल्या स्वप्नांना मिळे निसर्गाची दाद
हाती गोफण घेऊन गंगू तू हाकल पाखरं //३//
कृपा निसर्गाची आलं आनंदी उधाण
करूया रक्षण राखू निसर्गाचा ग मान
दाण्यांनी भरेल ओंजळ मिळालं हे दान
हाती गोफण घेऊन गंगू तू हाकल पाखरं //४//
आस रासेची पूर्ण पडेल दुधात साखर
फिटे डोळ्यांचं पारणं ढीग तो भरपूर
मिळेल पोटभर अन्न पडे आनंदात भर
हाती गोफण घेऊन गंगू तू हाकल पाखरं //५//
सौ. वर्षा मनोज भांदर्गे
अमरावती
7709745199
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने