नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पावस गावामंदी, कोण बसल पारावरी
स्वरूपानंद गुरु,गुरु वाचितो ज्ञानेश्वरी .
दत्ताच्या देवळात,कुणी लाविली तेलवात ,
स्वरुपानानाद गुरु,गुरु ध्यानस्थ मंदिरात
पावस गावामंदी ,कोण योगी ग राहतो
स्वरूपानंद गुरु ,सोहम साधना करतो
टाळ चीपळयाचा नाद ,ऐकू येतोय ठायी ठायी
गुरूची माज्या दिंडी ,आली चालत पायी पायी
पावसेचा लौकिक ,सातासमुद्रा कसा गेला
गोडबोलेंचा आप्पा ,स्वामी स्वरूपानंद झाला
गुरूच माज्या पाय ,लोण्यापरास हायत मऊ,
बाळ माज्याला किती सांगू ,चाल दर्शन दोघ घेऊ .
गुरूच माज्या पाय ,जस लोण्याच गोळ,
बाळ माज्याला किती सांगू ,संत चरणी लाव डोळ.
सयानु पाहू चला ,वाडी गावीच नवा घाट,
दत्ताच्या आंघोळीचा ,कृष्णा बाईला गेला पाट.
प्रतिक्रिया
सुंदर झाल्यात जात्यावरील
सुंदर झाल्यात जात्यावरील ओव्या.
याला स्वरुपानंद स्वामीचे श्लोक असेही म्हणता येईल.
शेतकरी तितुका एक एक!
पाने