Ramram नमस्कार !  Ramram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




काव्यप्रकार- गीतलेखन ...

काव्यप्रकार- गीतलेखन

शीर्षक- आर आर बळीराजा,,,

आर आर बळीराजा
तु मोकलु नको धाय,
कसताना जिवापाड
जोमताना काळी माय,,,,1
कोपला निसर्ग राजा
परी सोडू नको आसं
नको सोडू संकटात
जगण्याचा निजध्यास,,,,,2
कोरोना आला,आली मंदी
कैक संकटाचे पाश
तुलाच करावा लागे
तुझ्या संकटांचा नाश,,,,3
अनुदाने येतीलही
येती कर्जाचे डोंगर
नाही सुटणार कधी
हातातला रे नांगर,,,,,4
लई पाहिले रे ज्ञानी
पण तूच रे सज्ञान
मातीत पेरून जीव
करी घामाचे सिंचन,,,,5
पॉझिटिव तूच खरा
साऱ्या जगाचा पोशिंदा
होऊ नको निराश तू
तुला तुझाच रे खांदा,,,,6
झुगारुनी दे अन्याय
स्वतःसाठी उभा रहा
रक्तातले पेटव निखारे
उत्कर्ष तुझा तूच पहा,,,,7

जयश्री नांदे

Share Photo: 
Image Style: 
large
Share

Comments

  • Sudam Narayan Agale's picture
    Sudam Narayan Agale
    Sun, 27/09/2020 - 18:36. वाजता प्रकाशित केले.

    सुदाम नारायण आगळे
    औरंगाबाद
    8149743606

  • Bhushan Sahadeo Tambe's picture
    Bhushan Sahadeo...
    Mon, 28/09/2020 - 01:06. वाजता प्रकाशित केले.

    खूप छान रचना.

  • Jayashree nande's picture
    Jayashree nande
    Mon, 28/09/2020 - 07:28. वाजता प्रकाशित केले.

    धन्यवाद

  • Jayashree nande's picture
    Jayashree nande
    Mon, 28/09/2020 - 07:34. वाजता प्रकाशित केले.

    आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद

  • Narendra Gandhare's picture
    Narendra Gandhare
    Mon, 28/09/2020 - 20:37. वाजता प्रकाशित केले.

    धिरगंभिर काव्य

    Narendra Gandhare

  • Jayashree nande's picture
    Jayashree nande
    Mon, 28/09/2020 - 23:41. वाजता प्रकाशित केले.

    धन्यवाद

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Sat, 10/10/2020 - 13:50. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही  प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास  विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.


    सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल.  त्यासाठी  Fingure-Right  लेखन करा  Fingure-Leff  येथे क्लिक करा. या धाग्यावर क्लिक करून आपली प्रवेशिका नव्याने सादर करावी.

    शेतकरी तितुका एक एक!

  • Pages