![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
सरकारला बळी ठणकाव की अता.
'मिळवून दे नफा हो अन्यथा दफा!'
(१ ला शेर)
असशील तू किती सरकार पण तरी,
पाहत रहा कसा करतो तुला सफा.
(२ रा शेर)
तू पाळ तर म्हणा आश्वासने तुझी,
की दाखवू तुला असते कशी वफा.
(अंतिम शेर)
धोरण तुझे मरण अन आमचे कसे?
का माजल्या परी तू वागतो असा?
(मक़ता)
झाले अरे असे समजावणे किती,
'रविपाल' कर खरच आता रफा दफा.
°°°
वृत्त: प्रमद्वरा [(गागालगा लगा)×२], गणात्मक निर्वाह (गणभंग न करता).
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
जबरदस्त गझल भाऊ!
पाहत रहा कसा करतो तुला सफा
लय तणकट माजलय इथे......
धन्यवाद धिरज साहेब!
अत्यंत आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
पाने