नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मायेची लेकरं
कुठं शोधू मी तूला रे
सारी अंधारली वाट
दुर जाऊनी प्रकाशा
का फिरवीली पाठ
एक आस तूच आहे
सोड एखादे किरण
तुझी वाट पाहता रे
कितीदा सोडलं मरण
लढा लढेन हक्काचा
हवी मला तुझी साथ
एक किरण पाड दारी
करेन दुख:वर मात
विश्व व्यापून न रे तू
पार केला भवसिंधू
नाही कळलारे आम्हा
आमच्यातलाच भोंदू
आम्ही आमचा समजुनी
दिली बसायला गादी
भोंदू आम्हा बनवुनी
नाही दिली साथ साधी
झेप घेण्यारे निघाली
काळ्या मायेची लेकरं
दाणा चोचीत भरण्या
जशी थव्यातील पाखरं
- रंगनाथ तालवटकर
चिखली,जि.वर्धा
७३८७४३९३१२
rangnathtalwatkar31@gmail.com
प्रतिक्रिया
छान कविता
सुंदर काव्य, तालवटकरजी!
Dr. Ravipal Bharshankar
पाने