![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी आत्महत्या....
का करतो त्याग या अनमोल देहाचा
का कंटाळला या रुपेरी जीवनाला
का पोरके करतो या कोवळया-निष्पाप लेकरांना...
का नाही ठाव तूला,
तिमीराकडून वाट जाते प्रकाशाकडे....
असतील जरी दुखःच्या सरीवरी सरी...
तरी पुन्हा येतील रे आनंदाच्या सरी तुझ्या दारी...
का आमच्या विचारांची करतोस दिवाळखोरी
नसली आली विकासाची गंगा दारी.
म्हणून तथाकथीत सुधारणावाद्यांच्या अव्हानांने
का थाबंली नाही विटंबना तुझ्या देहाची जिवंतपणी...
मेल्यावर करतील मग भाडंवल तुझ्या देहाचे,
हे टवाळखोर....
सत्तेचा चाखतील मलीदा आणी
खातील लोणी तुझ्या मङयावरचे
नाही राहीला वाली कुणी या धर्तीवर...
जाऊन सांग त्या परमेश्वराला
त्यांच्या कुकर्माची कहानी
स्वर्गात गेल्यावरी....
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने