नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ध्यान
उन वारा मेघ गारा ह्या इथे कडाडती
भुवनाचा ह्या पसारा पार उघडा पाडती
धाव घेई सर्व शक्तिनीशी विसरुन देहभान
सावजाला येत नाही नाव रूपा आरती
कवटीमधला मेंदू आहे संकटाहून लहान
माणसाचा जीव घेती माणसाचे ज्ञान//१//
भुतलावर जन्म घेण्या जाळेमुळे वाढती
यंत्रणेच्या वरती डोके स्व- तंत्रतेने काढती
दिव्यतेचा हा फुलोरा मंत्रनेहून वेगळा
ज्याने पाहिलेस सुत्रा त्यास मोती माळती
यातनेच्या पूर्वजांना येत नाही शहाण
माणसाचा जीव घेती माणसाचे ज्ञान//२//
तारकांनी देत जावे ह्या धरेला सारथी
मागणारे होत नाही अमृताचे प्रार्थी
युगयुगातुन पार जाता भंगलेला भोवरा
क्रांत होतो भोवताली अन समेवर बार ती
ध्यान आहे प्रभू तव चेतनेचे स्नान
माणसाचा जीव घेती माणसाचे ज्ञान//३//
प्रतिक्रिया
अप्रतिम
अतिशय सुंदर आणि नैदानिक असे काव्य!
पाने