मातृप्रेम
भरल्या बाजारात, मी का हिंडते चारी वेशी,
बया वाचुनी, हट्ट करू मी कुणापाशी.
आईचा उपकार, कसा फेडू मी सांगा देवा,
करी मांडीचा चवरंग, नेत्राचा केला दिवा.
जीवाला जड भारी, कसं कळालं हरणीला ,
बया माज्या ग माऊलीचा, पाय थरेना धरणीला.
जीवाला माज्या जड ,शेजी बघती वाकुनी,
माजी ती बयाबाई, आली कामधंदा टाकुनी.
पाटच्या पाऱ्यामंदी, तोंड पाहिलं कुणायाचं,
माज्या त्या माऊलीचं, जन्म दिलेल्या आईचं.
-------------------------------------------------------