पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शाळा
तो पहिला पाऊस ... ती रंगीत छत्री भरलेलं दप्तर ... आदल्याच रात्री हातात धरलेलं दादाचं बोट फुलपाखरांनी भरलेलं आपलं पोट बाईंनी घेतलेला मुका दिलेली कळी जिभेवर विरघळलेली पेपर्मेंटची गोळी गच्च मुठीत धरलेलं ते रूपयाचं नाणं नव्या नव्या वहीची ती नवीकोरी पानं नव्याकोऱ्या पुस्तकांचा घेतलेला वास चालू वर्गातच सोडलेला उपवास नवे नवे कपडे नवे नवे श्यूज नव्या पुस्तकातलं नवंच गुज नव्या ड्रेसवर पडलेला शाईचा डाग नव्या नव्या मित्राचा आलेला राग ती मधली सुट्टी तो गोपाळकाला ते सोडावाटर ते बरफ का गोला काढलेला चिमटा केलेल्या चुका आठवीच्या अभंगातून भेटलेला तुका
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.