पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
कान पिळलेच नाही
उपदेशाने कान कसे पिळलेच नाही माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही
निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने पानगळीतही मग पान गळलेच नाही
वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो तेव्हापासून व्यथांनी छळलेच नाही
चिरंतन असती बोल संत साहित्याचे अनीतीच्या शेकोटीत जळलेच नाही
श्रावणात घननिळे जरा पिघळले होते पुन्हा त्यांचे थेंब कसे वळलेच नाही
जनसेवेचा प्रताप आणि ’अभय’ पुरेसे शुभ्रकापड घाणीतही मळलेच नाही
गंगाधर मुटे ................................................... (वृत्त - मात्रावृत्त )
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.