नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बाप
शेतकरी बाप माझा
काय सांगू त्याची कथा
रोज खेळे मातीसंगे
माडंली ना कधी व्यथा ||धृ||
निळ्या आभाळात दिसे
जवां बापाची रे काया
बाप सांगे तवां मला
लाव धरणीला माया ||१||
उसवल्या संसाराला
बाप घालतो रे टाके
मनी माझ्या येई तवां
पायी असे किती काटे ||२||
पायाच्या भेगात कधी
दिसे नशिबाच्या रेषा
मिटेल कधी अंधार
येईल सुखाची उषा ||३||
सांभाळून जीव असा
दिला जगाया आधार
कसे फेडू उपकार
जीवन माझे साभार ||४||
करी जगण्याची वारी
रानी वाजवी मृदंग
धरी मायेची सावली
बाप होई पांडुरंग ||5||
संदीप ढाकणे
7588512467
औरंगाबाद
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
रानी वाजवी मृदंग
कविता आवडली!!
धन्यवाद
पाने