नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय - आंतरजाल लेखन स्पर्धा २०१६
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६ विभाग : ब) छंदमुक्त कविता
|| शेतकरी चळवळीच बीजं ||
आहे कुठे जाण आम्हां बळीराजाची
त्यानेच तर आपणांस आहे घडवलं,
बळीराजाची ही व्यथा तर नित्याचीच
अवर्षणान वा अवकाळीन नासवलं ||
फेकतो रोज आम्ही शिजवून हे अन्न
भाव असतो मनी त्यात काय बिघडलं,
करतो अनादर अन्नाचा व अन्नदात्याचा
फेकून पैसा त्यास आहे कसं डीवचलं ||
नाही घासाघीस वा कीचकीच मॉलमध्ये
करतो भाव चार आण्याच्या भाजीवरलं,
नाही झाला आजवर उत्कर्ष कोणाचा
ज्यांनी शेतकऱ्यांस असेल लाथाडलं ||
कितीही आपटली वा बडवली आपली
तरी शेतीचं महत्व आहे कुठे समजलं,
उद्योग क्रांती करुनी का सुटतील प्रश्न
खासाल तर होसाल हे नाही उमजलं ||
कृषी क्रांतीच खरी, खात्री वाटू लागली
शेतकरी चळवळीच बीजं रुजू लागलं ||
रविंद्र कामठे
रविंद्र किसनराव कामठे
पत्ता: प्लॉट नं. ६, स्वाती सोसायटी
“गुरुसद्न”, धनकवडी, पुणे – ४११०४३.
संपर्क क्र - भ्रमणध्वनी : +९१ ९८२२४ ०४३३०
विरोप पत्ता (ई-मेल) – ravindrakamthe@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने