नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
".मॉल."
डोळ्यांवर रिबेनचा काळा चस्मा
घातलेला जॉन इब्राहिम
अँडीदासचे शूज घातलेली सानिया
रेमंड्च्या कपड्यांमध्ये तेंडुलकर
हातात द्राक्ष घेऊन
उभा असलेला अमिताभ अन्
डिस्काऊंट ऑफर्स चे मोठे मोठे
फ्लेक्सेबल पोस्टर्स लपेटून
नटलेला "मॉल"...
प्रवेशद्वारावर हत्यारबंद सिक्युरिटी
सिनेमँक्स, बिगबजार, रिलायन्स
मोठमोठी दुकानं,
सीलबंद पिशव्या घेऊन
अव्याहत चालत असलेली माणसं..!
बाहेरच्या जगाचा
कानोसाही नसलेली ही स्वतंत्र दुनिया
कृत्रिम प्रेम, कृत्रिम माणसं
कृत्रिम हवा, कृत्रिम श्वास
इथं सारं काही करता येते कृत्रिम..
पण पाहता येत नाही
मानसातलं खुजेपण..!
पळणा-या शिड्यांतुन
चढत जाता येईल गगन भेदी जिने..
पायाची माती ही
होत नाही सहन, अशी इथली फ़रचाळलेली जमिन.
काचांतुन आरपार पाहता येतील
माणसं
पण माणसाला आरपार पाहण्याचं
यंत्र या महाकाय मॉल मध्ये
कुठच दिसत नाही..!
@sea.jopulkar
-(सागरजाधव'जोपुळकर)
चांदवड
9404805068