नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उतमात
तुमाले मैत हाये का....आपुन सरे येका अल्लगच चक्रात फशेल हावो तं??? त्याचा पर्दा आपल्या डोयावर, दिमाकावर पळेल हाये थो मंजे बिनकामाच्या खरेदीचा!!
आला सन का कर खरेदी....आला सन का कर खरेदी!! जुने लोकं किती निगुतीनं सौसार करत? आतासारकी उधळपट्टी ताहा नोती म्हनूनच त्याईचे ईस ईस येकराचे नंबर मांगं पळत. याडोटाईज मंदी दाखोतात तसं तसंच नाचसान तं मंग तं दोन लाख रूपय बी नाईत पुरत मैन्याले.
लानपनी आपले खेय फुकटाचे रायत. आता पैशे खर्च केल्याबिगर ना खेय खेयता येत ना दोस्त भेटत. ताहा आपून टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार कराचं पाहो. कोनाच्या लग्नाचा रूखवत राहो का शाळेतली कार्यानुभवातली येखांदी वस्तू ....घरातल्याच वस्तूनं बनवो. आता तं कागदाच्या नावा बनोनं शिकोते नर्सरी ले तं रंगारंगाचे ईकताचे कागद पायजे मास्तर ले. जशी काई घरातल्या पेपराच्या रद्दीची नाव पान्यात चालतच नाई . टिव्हीत दाखोतात का अमकं तेल, टमकं शाम्पू चांगलं हाये तं मारे कॕना च्या कॕना ईकत घ्याव अन् पुळच्या मैन्यात ह्या फेकून दुस-या घ्याव....वा रे वा !! आपुन सा-याईनं तो काळ पाहेल हाये जई भात्क्याचा कागदई आजी, माय जपुन ठुये चूल पेटोयाले कामी यीन म्हनून न् आमी आमच्या घरी येयेल पोश्टकार्डाच्या पट्ट्या कापून ठुवो अन् त्यानं दुसरी शेगळी पेटवो ,कायतं गॕस चं लायटर लवकर नास ना व्हाव म्हनून. कदी ताटात उष्टं जवन कोनं उरोलं नाई का कायची उतमात केली नाई.
आपल्या आबाआजीनं, मायबापानं आपल्यावर टाकेल हे काटकसारीचे सौस्कार कित्ती मोलाचे होते!! आता 'वापरा अन् फेकून द्या' चा जमाना आला तेच्यानं कचरा वाळला तो समुद्रात, वातावरनात जाऊन प्रदुषन वाळलं. त्यात गनपती, देवी सारके विसर्जनाचे सन, निर्माल्य, येच्यानं नद्या दुषित व्हतात तो येक अल्लगच इषय हाये. मंग बिमा-या अन् त्यासाटी दावखाना औषिद अन् ह्यांss खर्च अन् तेच नाई तं कोन्या दिळशायन्यानं सांगलं का कुलदेवीले बकरा द्या लागते, सत्तेनारायन करा लागते अन् अकरा जोळपे जीऊ घाला लागतात....ते बी तुपाशी खानारेच असले पायजे....गरीब गरजू उपाशी नाई चालत. अन् मंग खर्च झाला का गरीबी, कर्जबजारीपना अन् याजाने पैशे काळनं....वर मलेच किती दुख हाये म्हनून व्यसनाले जौळ करनं... त्यात अल्लग पैसा उधळनं...घरात पैले वाद अन् मंग वांदा...पा येक काटकसर नाई केली तं गोठ कुठुल्ल्या कुठीच जाते !!! येक चांगला गुन सोळला तं स-या निसर्गाले कितीक दुष्परिनाम भोगा लागतात!!
बरं यात स-यात मोठी भूमिका असते टिव्ही ची. त्यातल्या शिरेलायची. टिव्हीचं साॕफ्ट टारगेट मंजे हे शिरेला पायनारे... तिकळे ध्यान असलं का लेकराईच्या अब्ब्यासाकळे कायच ध्यान??...ते लेकरू मोबाईलात काय पायते हे कायले पाईन कोनी?? सत्यानासच सरा!! येका शिरेलात करवा चौथ दाखोली का दुस-या बी अन् तिस-या बी शिरेलात दाखोलीच पायजे. त्यातले कपळे, दागिने सोन्या चांदीचे नाई तं नकलीच सई लेकाचे पन शाॕपींग तं कराच लागते. त्याईले हे ध्यानात येत नाई का सनवाराले बाजारपेठा भरतात त्या फक्तं आपले खिशे कापाले. 'मार्केटींग स्ट्रॕटेजी' मंजे गिऱ्हाईक फसोयाची व्यूहरचना असते ते. आपून कर्ज काळून सन साजरा करतो अन् ईकनारे करोळपती होतंत. बरं त्यातई उलटं नुस्कानच!! उदा.- माळीले भूलाबाई मांडाले पाच जवारीचे धांडे पायजे म्हंतात. अशे पाच पाच धांडे पु-या गावाले लागतीन तं पुळे होना-या कितिक धान्याचा नास आपून आजच करतो...सांगा??
'झेन हॕबीट्स' हे येक जीवन जगाचं तत्वज्ञान हाये त्यात सांगतलं का सुखी व्हासाटी स-यात पैले तुमी आपल्या गरजा कमी करा. खरंच मले या वस्तूची, या गोठीची गरज हाये का,हे आंदी सोत्ताले इच्यारा अन् मंगच घ्या, करा.
तुमी म्हंंसान आमाले काईच कमी नाई...लय हाये घरचं; पन संसाधनाची नुस्कानी कराचा आपल्याले अधिकार नाईच. नासुकले दोन शब्द जास्तीचे वाया घातले तं कितिक नारायन- रामायन होते??
पा मंग मायबापहो, इच्यार करा. डबलनं कर्मकांडं अन् गुलामगिरीत जा चा रस्ता हाये असा उधयमांडकेपना मंजे. आपून बेताल झालो का जींदगी तीताल झालीच समजा.
विद्या भगतसिंग राणे (अकोला)
8888509456
प्रतिक्रिया
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
त्यामुळे नाईलाजाने सदर प्रवेशिका स्पर्धेतून बाद करून निमंत्रितांचे लेखन या विभागात हलवली आहे, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
पाने