नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मित्रांनो, मला सारखे असे वाटत राहते की आपण एका चक्रम चौकोनात फसत चाललो आहोत.
१. टोकाचे गोड्सेवादी
२. टोकाचे बहुजनवादी
३. टोकाचे आंबेडकरवादी
४. टोकाचे इस्लामवादी
यातले पहिले तीन भारतीय समाजातूनच उगवले आहेत. तर चौथा भारताबाहेरचा असून स्थानिक समाजाला बळजबरीने त्याच्या दावणीला बांधण्यासाठी नंबर एकचा गट जीवाचे रान करतो आहे. नंबर एकला प्रत्युत्तर म्हणून नंबर दोन रिमिक्स इतिहास आणि तत्वज्ञान सांगून देशाच्या एकतेला सुरुंग लावत आहे. कोणी नुसता आ वासला तरी तो फक्त भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यासाठीच वासावा हा तिसऱ्या गटाचा आग्रह असतो. भारतीय मुस्लीम प्रत्यक्षात इतके वादात पडू इच्छित नाहीत. मात्र पहिल्या तीन गटांनी त्यांचा द्वेष करावा यासाठी पाकिस्तानी अतिरेकी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत आहे... मला यातल्या सर्वच कट्टरवादी गटांची घृणा आहे... अर्थवादी विचार मंथन सुरु केले की हे त्यात जातीयवाद घुसवून मूळ पोस्टचा धुव्वा उडवतात. मात्र कुठल्या जयंतीचे निमित्त साधून हे पहिले तीन हे एकमताने आणि हक्काने माझी गाडी अडवतात. चौथा प्रत्यक्ष माझ्या मार्गात येत नसला तरी तो सगळ्यात जास्त देशद्रोही आहे, असे पहिल्या तिघांचे एक्मताचे (कोणी उघड कोणी छुपा) दडपण माझ्या खिशातून वर्गणी अक्षरश: काढून घेते.. यातही अनेक बहुभूज उपआकृत्या पुन्हा आहेतच.... त्यामुळे साधी गणपतीची वर्गणीही किमान दहा ठिकाणी द्यावीच लागते.... इच्छा असो की नसो शिवाजी महाराजांना वर्षातून दोनदा जन्माला घालावेच लागते. प्रत्येक गल्लीत एक महारुद्र हनुमान किंवा गणपती मंदिर असलेच पाहिजे, आणि त्यात अर्थात माझे योगदान असलेच पाहिजे. .... लावण्यांच्या तालावरील प्रबोधनगीते आणि डीजेच्या तालावर धुंद नाच ठीकठाक व्हावा यासाठी किमान पाच ठिकाणी पावती घेतलीच पाहिजे, नसता बाबासाहेबांचा अनादर करण्याची किंमत द्यायची वेळ कधीतरी येतेच....!चौथा गट मला कधी वर्गणी मागत नसला तरी त्याच्या पावत्या पाकिस्तानची असहाय्य जनता आपल्या विकासाचा बळी देऊन मुकाट्याने फाड्तच आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द नुसते उच्चारले तरी देव, धर्म, देश द्रोही खणून अंगावर येणारे हे गट वर्गणी साठी मात्र मी खिसा मुक्त ठेवावा असं प्रेमळ आग्रह प्रसंगी गुदगुल्या करून करतात, हे विशेष. आता या फायद्याच्या धंद्यात अनेक नवीन अस्मिता मोठ्या फौज फाटयासहित उतरण्याच्या तयारीत असलेल्या पाहून मी धास्तावलो आहे. या चौकोनाचा लवकरच पंचकोन, षटकोन, अष्टकोन होत वर्तुळ होणार हे दिसतच आहे.... . मी खूप अस्वस्थ आहे, पण या दुष्ट चौकोनातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाहीये, आपण काही मार्गदर्शन कराल का?
प्रतिक्रिया
या सर्व कट्टरवादी सांडांच्या
या सर्व कट्टरवादी सांडांच्या टकरीचे परीणाम मात्र अर्थवादी चळवळींना भोगावे लागतात.
शेतकरी तितुका एक एक!
गन्गाधरजी, अगदी योग्य शब्द
गन्गाधरजी, अगदी योग्य शब्द वापरलात ''सांड". या सान्डामुलेच देश अरजकाकडे जातोय.
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
पाने