Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




बळीनामा...

लेखनविभाग: 
पद्यकविता
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
बळीनामा...

बळीराजा तुझे बळ , 

कोणा कुळानं गिळलं ; 
तुझी वळचणीची दैना 
येड्या कोण रे टाळील?...
 
सोस-सोसते उन्हाळे, 
आला पाठीचा कातळ , 
तरी तुझ्या सपनात, 
उगा सारी उष्टावळ...
 
भेगलेलं सुखसदा, 
त्याची कर सांध मोड; 
उगा रुताडाच्या भेनं 
नको करू तडजोड...
 
तुझी जात शेषशाही
 तिन  हालव ही पृथ्वी; 
बांडगुळांना  विचार 
अशी पिढी ही कितवी...
 
तुझा नेता बळीराम, 
धारी त्याच्या बळीरामा:
 वामनांना समजु दे, 
तुझा खरा बळीनामा...
 
दिस वैेऱ्याचे होऊन 
तुझ्या पेडी धडकती, 
तरी जागा होउनिया 
आता कर एकमती...
 
येवो एखादा बळीव 
बुडो सारी दुःख बेटे,
कुणब्यांच्या काळजाची
देवा होवो एक पेठ...
 
इडा पिडा टळेल, 
राज्य बळीचे कळेल, 
फक्त हिरव्या धांदीत
सारी वंसळ बळेल..
 
साता जन्माचा मळभ
 मरणाआधीच गळेल, 
माझ्या हिरव्या बांडाचे 
तेव्हा पारणे फिटेल....
 
यशवंत पुलाटे 
दुर्गापूर ता.राहता
जि अहमदनगर
पिन कोड ४१३७३६
मो .न. 9657867499
 
Share

प्रतिक्रिया