नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल:राफेल
-----------------
खेळातले खिलाडी ख्रिस गेल होत गेले.
षटकार पण तयांचे मग झेल होत गेले.
विनवीत क्षेत्ररक्षक काळ्या ढगास तेव्हा,
खेळात एक तर्फी गुड वेल होत गेले.
अभ्यास आयटी,विष काँक्रीट,कारखाने,
शाळेत शेतकीचे पट फेल होत गेले.
जिंकून राज्य राजे होशात सर्व होते,
जेते हळू हळू पण मड्डेल होत गेले.
शेतात हिरवळीला नीरास दान द्या रे!
माझे नदी तलावे वाफेल होत गेले.
पाहीन नदपुलावर सांजेस स्वप्न आता,
सारेच स्वप्न ते ते जे फेल होत गेले.
समजून जीवनाला वाऱ्या तुझ्या गतीने,
साधे विमान माझे राफेल होत गेले.
काळानुसार आता राजेश बघ किती हे,
साहित्य माणसाचे रंगेल होत गेले.
व्रुत्त-आनंदकंद
-राजेश जौंजाळ
मो.८७८८३१७५५९
(whatsapp no.8605682541)
Email-rajeshjaunjal1983@gmail.com
(Note-माझ्या रचनेत चुकून कुणाचे शेर(lines) आले(उतरले)असतील तर please मला massage करून कळवावे.मी ते शेर(lines)वगळेन किंवा change करीन.)
------------------------------------------------
प्रतिक्रिया
छान...
खूप छान लिहिलंय...
Narendra Gandhare
पाने