नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वृत्त :- आनंदकंद
*शेतातले गऱ्हाणे ...*
ऐकून कोण घेता माझे जरा ग-हाने
द्यावी पिकास माझ्या किंमत हमी दराने
लागून भिंत आहे जर राहत्या घराची
भावात वाद होतो काहून मग धुऱ्याने
चिरतात अंग जेव्हा काट्यात बाभळीच्या
दाबून घाव घेतो माझ्याच कापसाने
जातो भल्या पहाटे शेतात तो उपाशी
ती आणते शिदोरी बांधून पालवाने
आली कुठून माझ्या चिकणी सडक नशीबी
काट्यास मित्र केले अनवान पावलाने
का वावरा विरोधी केली युती ढगांनी
मुक्काम ठोकलाया डोळ्यात पावसाने
शेतात कष्ट करुनी जर पोषतो जगाला
मरतोस मग कशाला लटकून कासऱ्याने
✍️
सुनिल बावणे
बल्लारपूर, चंद्रपूर
८३०८३३४१२४