![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोशिंद्याची शोकांतिका
सोनेरी पाश सावकारी 'विळखा' लय भारी,
कर्जात बुडाली शेती मेला शेतकरी ||धृ||
एका जमान्यामंदी होता शेतकरी राजा |
धुर सोन्याचा निंघे देशात गाजावाजा ||
दुष्काळ पडला पैशान नडला झाला कर्जबाजारी
||१||
लय काबाडकष्ट करुनी नाही सुखी |
वाट ढगाची पाहून मनात झाला दुखी ||
थकून गेला 'खल्लास' झाला डोळ्यांत आल्या सरी
||२||
घरी बायकापोरं उपाशीपोटी मरे |
'मायबाप बिचारे' मनामंधी हो झुरे ||
शासन - अजगर तोंड फाडून टपून बसला शिरी
||३||
चिंता दुसर्याची करतो मर-मर कष्टकरी |
देतो रोजगार इतरां दुसर्याला भाकरी ||
'एकांत' म्हणतो बळी देऊनी झाला स्वत: भिकारी
||४||
(गोडवा )
नको जाऊ बळी तू होईल ते होऊ दे |
आग लागो जगाले सपान तुव्हं फुलू दे ||
अक्कल ठिकाणी आल्यावर तू होशील रे 'पुढारी'
||५||
एकांत
नरेंद्र भाऊराव गंधारे
63-संत कबीर वार्ड, हिंगणघाट
जिल्हा- वर्धा 442301
संपर्क
9284151756
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर!
धन्यवाद सर!
Narendra Gandhare
पोशिंद्याची शोकांतिका
अप्रतिम रचना
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद सर !
धन्यवाद सर !
Narendra Gandhare
खूप छान!!!!
अप्रतिम रचना!!!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण