नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
भेटला ना शासनाचाही सहारा
ध्वस्त झाले पीकपाणी अन निवारा
(हुस्नेमतला)
कोण कोणा देत नाही बघ सहारा
खुद्द आता तू स्वतःचा हो पहारा
(1ला शेर)
झोपलेल्या शासकावर बोल हल्ला
घे उधळ हाती चितेमधला निखारा
(2रा शेर)
काढ पाणी लाथ मारुन तू अताशा
ठेव रे इतका भरोसा कास्तकारा
(3रा शेर)
इंग्रजाशी झुंजला तू मुक्तीसाठी
पण तुझाची देत नाही हे चुकारा
(4था शेर)
खेळणाऱ्या शासनाची उडव दंडी
जिंकल्यावर वाजवीतो मी नगारा
(अंतिम शेर)
तू कसा नाही बळी रे शोषणाचा?
कास्तकारा आजचा तू सर्वहारा!
(मकता)
पेट आता हो उबारा 'धीर' राजा
घे करूनी पूर्ण कोरा सातबारा
वृत्त :~मंजुघोषा
लगावली :~गालगागा गालगागा गालगागा
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने