नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मकता)
असते कशी शहादत पाहून या तुम्ही.
सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही.
(१ ला शेर)
शेतामधे पिकाला चिरफाडता जसे,
वैऱ्यास त्याप्रमाणे कापून या तुम्ही.
(२रा शेर)
तुमच्या खुळेपणाला फळ लागले खुळे,
आतातरी हुशारी पेरून या तुम्ही.
(३ रा शेर)
खचलेत मृत बळीचे आई वडील मुले,
आधार जा तयांना देवून या तुम्ही.
(अंतिम शेर)
देऊ नका ठगांना आता पुन्हा मते,
जे गाडती तयांना पाडून या तुम्ही.
(मक़ता)
भगवा निळा नि हिरवा एकत्र ज्यामधे,
'रविपाल' तो तिरंगा रोवून या तुम्ही.
°°°
निर्वाहन:
वृत्त: विद्युल्लता (गणभंग न करता).
सादरीकरण: स्वतंत्र तरन्नुम.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
डॉ. साहेब अप्रतीम गझल!!!!!!
खुप खुप आभार धिरजभाऊ आपले!
धन्यवाद!
Dr. Ravipal Bharshankar
अतिशय जबरदस्त प्रेरणा
क्या कहने!
Pradip
पाने