Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी

Main page content

Profile picture for user संपादक
By संपादक | 2:17 PM IST, गुरू June 23, 2011
Attachment Size
sharad Joshi.jpg 854.53 KB
Sharad-Joshi.jpg 144.89 KB
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
शरद जोशी
   प्रस्तावना


             श्री गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेच्या शिबिरातील शिबिरार्थी. आपली पहिली कविता त्यांनी लिहिली ती शेतकरी संघटनेच्या प्रभावात आल्यानंतर. ‘सरकारचे धोरण’ (बरे झाले देवा बाप्पा....) ही त्यांची पहिली कविता ‘शेतकरी संघटक’ या शेतकरी संघटनेच्या मुखपत्राच्या ‘ग्रामीण अनुभूती विशेषांक (२६ जुलै १९८५)’ मध्ये प्रसिद्ध झाली. वाचकांना ती भावली, कवितेचे अनेकांनी कौतुकही केले. त्यानंतर दीर्घ काळ त्यांनी कविता लिहिली नाही. कदाचित, त्यांनी स्वत:च आपल्या एका गझलमध्ये म्हटल्याप्रमाणे


“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली।
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळतांना॥”


या परिस्थितीचाच तो परिणाम असावा. पुढे भाकरीच्या शोधात असताना आलेल्या अनुभवांतून,


“प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना।
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना॥”


                                           अशी ती साकारली. तर,



“आता ‘अभय’ जगावे अश्रू न पाझरावे।
आशेवरी निघावे ही वाट चालताना॥”


याप्रमाणे निश्चयाने व्यक्त होत गेली. आणि,


“तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा।
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा॥”


याप्रमाणे बहरत गेलेली दिसते.

           ‘रानमेवा’ या संग्रहात कविता, बालगीत, गझल, लावणी आणि नागपुरी तडका अशा विविध रूपांत कवीने आपला भावाविष्कार शब्दरूप केला आहे. काव्यलेखनासाठी ‘अभय’ हे टोपणनाव वापरले आहे.
आपल्या मायबोलीचे महत्त्व वर्णन करताना,


“जरी वेगळी बोलती बोलभाषा। अनेकांत एकत्व ही प्राणभाषा।
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली। घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!”


असे सांगत,


“तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी।
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली॥”


असे कवी आपल्या व्यासंगाला व्यक्त करताना दिसतो. तर,


“मकरंदाहुनि मधुर तरीही। शर शब्दांचे धारदार।
तळपत असता जिव्हा करारी। हवी कशाला मग तलवार ॥”


असे तिचे सामर्थ्य सुर्व्यांच्या आवेशात वर्णन करून


“जोषालागी साथ निरंतर। कधी विद्रोही फूत्कार॥”


अशी विद्रोही अभिव्यक्ती साधतात आणि आपल्या सहकारी युवकाला,


“आता कवेत घे तू, अश्रांत सागराला।
कापून लाट-धारा, तू खोल जा तळाला।
रोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची॥”
याप्रमाणे साद घालतात.


स्वाभाविकपणेच, फ़ुत्कारणारी ही कविता मातेच्या विस्कटणार्‍या संसाराने हळवी होऊन,


“छप्पर उडल्या संसारात। ब्रह्मपुत्रा वाहते।
तेल मिरची शिदकुट। पाण्यावरती पोहते ॥”


अशा शब्दांत वेदना व्यक्त करते. आणि, आपल्या वाट्याला आलेल्या आसमानी-सुलतानी संकटाचे वर्णन करताना,

“सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी।
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी॥”
आणि

“सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे।
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे।
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे।
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे।
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी॥”


अशाप्रकारे उपहासात्मक, तरीही बोचर्‍या मार्मिकतेने व्यक्त होते.


         सभोवतालची उद्विग्न करणारी परिस्थिती, शेतीतलं भकास वास्तव, अगतिकता, निसर्गाचा प्रकोप, समाजातला ढोंगीपणा, राजकीय पुढार्‍यांचे निर्ढावलेपण, सुस्तावलेली दंडशाही, खालावलेले माणुसपण यांकडे निर्विकारपणे पहात रहावत नाही म्हणून विडंबनाच्या अंगाने उपहासात्मक रितीने कवी आपल्या अनुभूतींना शब्दरूप करताना सर्वत्र दिसतो.

विकृतीकडे झुकलेल्या समाजघटकाचे ‘माणुस’ या कवितेत,


“अरे माणूस माणूस।
कसं निसर्गाचं देणं।
गुण श्वापदाचे अभये।
नाही मानवाचं लेणं॥”


असे वर्णन करून त्याकडे निर्देश करीत कवी,


“आता उजाडेल, मग उजाडेल।
‘अभय’ कधीतरी उजाडेल?।
की.....।
तू तसा-मी असा।
म्हणून उजाडणेही बुजाडेल?॥”


असा गर्भित इशारा देणारा प्रश्न उपस्थित करतात.

             मार्मिक विडंबन व उपहासात्मक लेखणीच्या अंगाने जाणारी या संग्रहातील कविता चांगली वठली आहे. प्रस्तुत कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी स्वत:चे वेगळेपण दर्शवणारा आहे. सध्याच्या काळातही मराठी कविता नवोन्मेषाने व्यक्त होऊ घातली आहे याचे प्रत्यय देणारी भाषा आणि प्रगल्भता कवी मुटे यांच्या कवितांत व्यक्त झाली आहे. चटके देत, तरीही सावधानतेचा इशारा देऊन परिवर्तनाला भाग पाडणारी शब्दसंपदा कवीने आपल्या लेखनात अभ्यासाने उतरवली आहे.


“विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता।
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता।
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी।
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी।
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही॥”

किंवा

“कनकाच्या भिंती। सोन्याचे कळस॥
सोन्याची हौस। देवालाही॥”

“आम्हां का रे असा। गरिबीचा शाप॥
असे काय पाप। आम्ही केले?॥”

“त्यांचे शुभ हस्त। कसे सांगा देवा॥
हरामाचा मेवा। चाखती ते॥”


असे सर्वच क्षेत्रांतील कटु वास्तव स्पष्ट करीत,


“कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?।
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?।
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?।
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?।
काळी आई का बंधना? मना... अभय दे कारणा॥”


असा मनाला विषण्ण करणारा प्रश्न कवी उपस्थित करतो. तर पुढे जाऊन,


“घे शोध स्वत्व, त्याग आत्मग्लानी।
वाली तुझा तूची, बळ अंगी बाणी।
लाली भोर ल्याली, सरली निशा काळी।
"धडपड" हीच किल्ली, भविष्या उजाळी।

घे अभय भरारी मित्रा,
घे एकदा भरारी,
घे एकदा भरारी॥”


या शब्दांत येणार्‍या विपत्तींशी लढण्यासाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्‍नांची कास धरण्याची ऊर्मी प्रकट करतो.

         बळीराजाच्या वाट्याला आलेले कटू वास्तव कवीने अत्यंत नेमक्या शब्दांत अनेक कवितांतून व्यक्त केले आहे; त्याच बरोबर, वास्तवाला समर्थपणे सामोरे जाण्याची जिद्दही त्याच वेळी व्यक्त केली आहे.


“असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी।
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी॥”

“भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला ’अभय’ गाठतो।
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी॥”


आणि तरीही,


“आगीत खेळताना, सूर्यास छेडतो मी।
कोळून पी ’अभय’ तो अंगार चित्तवेधी॥”

असे म्हणत,

“नको रत्न मोती न पाचू हिरे ते
‘अभय’ ते खरे जे मिळाले श्रमाने॥”


असे आत्मभान जागवण्याचे धैर्यही या कवितेतून व्यक्त होते.


“तुझी भूक किती, तू गिळतोस किती?।
अभयानं जनता पिळतोस किती?।
तुझे योगदान किती, तू लाटतोस किती?।
नाकानं गांजरं वाटतोस किती?।”

किंवा

“राजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे।
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे॥”,

“लाल दिव्याचा हव्यास केवळ, केवळ सत्तापिपासा
घाऊकतेने भरडून खाती, हीनदीनांच्या आशा॥”


“ ‘सहकारात’ होते तेव्हा, काय तोरा व्हता।
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता।
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया।
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया॥”


                  यासारख्या ‘नागपुरी तडका’ या काव्यप्रकारातील उपहासात्मक लेखनशैलीतील ओळी कवीच्या स्वतंत्र लेखनवैशिष्ट्याचे दर्शन घडवितात. वेगवेगळ्या वैगुण्यांवर नेमकेपणाने भाष्य करण्याचे कवीचे शब्दसामर्थ्य परिणामकारक झाले आहे. खरेतर, या संग्रहातील अनेक कविता पूर्णपणेच वाचण्याच्या योग्यतेच्या आहेत असे म्हणावे लागेल.


                  प्रतिभेचे साहित्यातील महत्त्व कधीही न संपणारे आहे, तरीसुद्धा प्रतिभेइतकेच महत्त्व परिश्रमांनाही आहे. कवी मुटे यांनी अभ्यासपूर्वक आणि वेदनेच्या अंगाने जाणारे तरीही आत्मभान जागविणारे लेखनसामर्थ्य प्रकट केले आहे, त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.


                                काहीशी सुरक्षितता लाभल्यावर, लेखक-कवी आपल्याला आलेल्या अनुभवांचे प्रकटीकरण करणारे साहित्य निर्माण करतात. ही निर्मिती होतच राहणार. परंतु, अन्यायाच्या निर्दालनासाठी आणि वेदनांच्या परिहारासाठी एखादा तुकड्या, एखादा कबीर, एखादा तुकाराम आमच्यातून निर्माण व्हावा यासाठी मात्र वाटच पहावी लागेल.

                                                                                      शरद जोशी
                                                                               अंगारमळा, आंबेठान
                                                                                 ता. खेड जि. पुणे
.................................................................................................................
sharad Joshi
शरद जोशी
baliraja
बळीराजा
रानमेवा
अभिप्राय
Farmer
Gangadhar Mute
shetkari
अभय
गंगाधर मुटे
ग्रामीण
नागपुरी तडका
मराठी गझल
मराठी हझल
माझी कविता
वाङ्मयशेती
शेतकरी
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
समीक्षण
कविता
काव्यधारा
तुंबडीगीत
देशभक्ती गीत
बालकविता
अंगाईगीत
पाळणा
बालगीत
भक्तीगीत
ओवी
गौळण
भजन
मराठीचे श्लोक
लावणी
विडंबन
विनोदी कविता
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 23737 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 15 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    14 hours 43 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    14 hours 45 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    14 hours 47 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    14 hours 50 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 15 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
८ वे अ.भा.म.शे.सा.संमेलन : कार्यक्रमपत्रिका 3
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 3
मातृत्वाचा शृंगाररस 3
गणपतीची आरती ॥३५॥ 3
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 3
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका 3
शेतकऱ्यांचा राजा बळीराजा 3
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 3
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 3
कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' 3
वांगे अमर रहे...! 3
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 3
शेतकऱ्याची व्यथा 3
जय विदर्भ? 3
हूसास 3
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पारितोषिक वितरण 3
शेतकऱ्यांच्या जीवनाचा सातबारा : सुखदेव ढाणके ह्यांचा काव्यसंग्रह :पिंडपात 3
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 3
मास्क आणि ती.... 3
दुःखात राहतो मी 3

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,119
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,762
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,743
वादळाची जात अण्णा 31,518
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,192
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,162
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,888
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,753
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,255
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,941
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,491
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,239
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,995
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,464
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,786
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,256

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini