नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लिखाणामधे खूप विविधता
"रानमेवा" कविता संग्रह पाहिला....as usual, जबरदस्त आहे.... काही काही कविता मायबोलीवर आधी वाचल्या होत्या, तरीही पुन्हा वाचताना नव्याने अर्थ उलगडत गेला. प्रत्येक कविता ही आधीच्या कवितांपेक्षा वेगळी आहे आणि मुटेंच्या शब्दशैलीबद्दल तर मी काय बोलावे? एखादी कविता अगदी साध्या शब्दात तर एखादी एकदम लयबध्द वृत्तामध्ये बांधलेली... खूपच सुंदर..! “नागपुरी तडका” आणि "प्राक्तन फ़िदाच झाले" ही गझल लिहिणारी व्यक्ती एकच आहे यावर विश्वास बसत नाही.... मुटेंच्या लिखाणामधे खूप विविधता आहे.....!!!
बर्याच कवितांमध्ये त्यांनी शेतकर्याला वाचा फ़ोडली आहे. आपल्यासाठी अन्नधान्य पिकवणारा शेतकरी स्वत:च कसा अन्नासाठी गळफ़ास लावून घेतो हे त्यांच्या कवितांमधून खूप जाणवते आणि मन हेलावून टाकते.
"रानमेवा"ला भरभरून शुभेच्छा आणि आम्हाला असाच नवनवीन आंबट-गोड "रानमेवा" चाखायला मिळत राहावा, ही सदिच्छा...!
स्वप्नाली गुजर
डेट्रॉइट, मिशीगन, अमेरिका
................. **.............. **............. **.............