Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पाणी लाऊन हजामत

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:36 PM IST, गुरू August 01, 2013
पाणी लाऊन हजामत



गुदस्ता पाऊस आलाच नव्हता

कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता

पीक उगवलंच नव्हतं

जे उगवलं ते जगलंच नव्हतं

जे जगलं ते वाढलंच नव्हतं

जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं

निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!



सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं

आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं

घेन्न! आता कसं वाटsssssते?

आम्ही म्हणालो होतो

मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!



पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं

मात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं

हात काही त्यानं पसरलाच नव्हता....!



औंदा मात्र पाऊस आला

जिकडेतिकडे कहर झाला

डोंगर-दर्‍या हुदडत गेला

छाती फोडून दरवाजा केला

उभं पीक वाहून गेलं

जे वाहवलं नाही ते दबून गेलं

जे दबलं नाही ते कुजून गेलं

जे कुजलं नाही ते सडून गेलं

जे सडलं नाही ते मरून गेलं

निसर्गानंच केली! हजामत केली!! पाणी लाऊन केली!!!



सरकार आलं, मुठभर घेऊन आलं,

आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,

घेन्न! आता कसं वाटsssssते?

आम्ही म्हणालो,

मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!



पण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं

हात काही त्यानं पसरलाच नाही....!

मात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं

स्वत:शीच पुटपुटत होतं



"च्यामारी! आयला!! च्यामायला!!

जवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं

तवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं

रुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला

म्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला

ह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली

गावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली"



"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं

कणभर मदतीची भीक मागत सुटणं"



"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर

भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"



येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो

मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो



                                             - गंगाधर मुटे ’अभय’

---------------------------------------------------------
ग्रामीण
शेतकरी
शेतकरी काव्य
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
मार्ग माझा वेगळा
Gangadhar Mute
अभय
माझी कविता
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव

महादेव कापुसकरि (-)

शुक्रवार, August 2, 2013 - 13:01
Permalink
New

शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव असनारे लोक या भारत देशाच्या पाठिवर अतिशय अल्प प्रमानात आहेत हे खरे दुर्दैव आहे. आनि शासन आनि सत्ताधारि ( मग ते कोनत्याहि पक्शाचे असोत ) सर्व समजत असतानाहि जानिवपुर्वक डोळेझाक करतात त्यामुळे हा घटक स्वातन्त्र्यपुर्व काळापासुनच सर्वात उपेक्शित राहिला आहे.आपल्यासारखे मोजकेच लेखक या उपेक्शितान्चे दु:ख जानुन त्यान्च्याविशयि लिहितात हेहि नसे थोडके !

  • Log in or register to post comments
धन्यवाद

गंगाधर मुटे

मंगळवार, August 13, 2013 - 21:19
Permalink
New

धन्यवाद महादेवराव कापूसकरी सर.

  • Log in or register to post comments

In reply to शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव by महादेव कापुसकरि (-)

"हक्काचं टनभर सरकारवर

कविता गोरे

मंगळवार, November 4, 2014 - 12:56
Permalink
New

"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं
कणभर मदतीची भीक मागत सुटणं"
"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर
भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"
येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो
मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो

  • Log in or register to post comments
धन्यवाद

गंगाधर मुटे

मंगळवार, November 4, 2014 - 13:26
Permalink
New

धन्यवाद कविता गोरे
या कवितेची आठवण काढून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. :namo:

कविता लिहिल्याच्या दिवसापासून पुन्हा मीच वाचली नव्हती. अशा अनेक कविता/लेख आहेत की ते पुन्हा वाचायची मी हिंमत करू शकत नाही.

आज ही कविता फेसबूकवर शेअर करत आहे. :)

  • Log in or register to post comments

In reply to "हक्काचं टनभर सरकारवर by कविता गोरे

(विषय दिलेला नाही)

कविता गोरे

मंगळवार, November 4, 2014 - 13:27
Permalink
New

:)

  • Log in or register to post comments
ज्वलंत!

अत्रुप्त आत्मा

मंगळवार, November 4, 2014 - 15:12
Permalink
New

ज्वलंत!

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11412 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,392 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,334 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,289 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,067 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,507 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,448 5 नागपुरी तडका 8 years 1 month
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,238 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,974 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,142 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,029 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,496 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,344 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,292 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,288 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,380 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,630 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,440 0 रानमेवा

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 2915 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day ago
  • धन्यवाद
    1 day ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 1 hour ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 1 hour ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 1 hour ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 1,248
माझे फेसबूक स्टेटस-1 1,229
माझे फेसबूक स्टेटस - 2 1,013
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 957
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 199
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 199
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 170
मातृत्वाचा शृंगाररस 157
काही सुटे अन काही मुटे शेर 152
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 151
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 140
रानामधले शेर...! 136
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 133
नागपुरी तडका - ई पुस्तक 130
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 126
कवी संमेलन/गझल मुशायरा २०१७ : अटी आणि शर्थी 119
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान 116
रानी चा पाऊस अन्- ती 112
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 107
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : नियम, अटी व तपशिल 100

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,198
माझे फेसबूक स्टेटस-1 183,547
शुभारंभ 135,039
रानमेवा - भूमिका 109,401
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,766
आजचे शेतमालाचे बाजारभाव 96,370
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,582
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,213
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,831
उद्देश आणि भूमिका 77,797
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 75,440
विचारपूस 71,983
गणपतीची आरती ॥३५॥ 67,965
सत्कार समारंभ : वर्धा 66,842
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,390
किती चाटणार भारतपुत्रा? 62,165
जात्यावरची गाणी 56,104
माझे फेसबूक स्टेटस - 2 51,511
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,134
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,595

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini