नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ये रे पावसा
सुक्या नदीला तुझी जाणीव देण्यासाठी,
मातीस ओलावुनी गंध घेण्यासाठी
आता तरी येरे पावसा
नीजलेल्या शेतांना जागवण्यासाठी.(1)
वीहीरीचा रहाट ओढण्यासाठी
पाना फुलांनी गाव वेढण्यासाठी,
आता तरी येरे पावसा
हीरवागार डोंगर चढण्यासाठी.(2)
शेतकर्यांना नीवांत नीजवण्यासाठी
घरा दाळ तांदुळ शीजवण्यासाठी,
आता तरी येरे पावसा
आसुसलेल्या देहांना भीजवण्यासाठी.(3)
पीकांना खुलवण्यासाठी
बुजगावण्यांना डोलवण्यासाठी,
आता तरी येरे पावसा
डोईवरचे कर्ज उतरवण्यासाठी.(4)
प्रज्ञा आपेगांवकर.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने