नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वरचित कविता ( गझल )
================
बैल माझा
********
शेतीत राबणारा, गोठ्यात बैल माझा..
यंत्रास आज वाटे, तोट्यात बैल माझा...!
मज ग्रासते जराशी, चिंता खरोखरी ती..
जाईल ? वर्तमानी, रेट्यात बैल माझा...!
जीवास मालकाच्या, देणार जीव राजा..
डौलात रेशमाच्या, फेट्यात बैल माझा...!
कोणी नका लोटू, गर्तेत आजच्या या..
मुद्दाम अडकवू हा, खेट्यात बैल माझा...!
मातीस जोडलेली, तुटणार नाळ नाही..
गणनार काळ नाही, खोट्यात बैल माझा...!
✍ महादेव बी. बुरुटे ,
६५०, जे. मार्ग, शेगांव
ता. जत, जि. सांगली
PIN- 416 404
Mob- 9765374805
Email: burutemahadev@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
बैल माझा
छान गजल!
धन्यवाद
मस्त गजल
मस्त गजल
पाने