नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धा -2024
विषय- शेतमालाचे भाव
दिनांक- 24-9 -2024
काव्यप्रकार -अष्टाक्षरी
शीर्षक - आता लढाया सज्ज हो
रात्रंदिन शेतामध्ये
राबतोया शेतकरी,
ऊन पाऊस झेलतो
अन्नदाता अंगावरी.
मोठ्या कष्टानं पिकवी
शेतमाल कास्तकार,
रास्त भाव ठरविण्या
नाही त्याला अधिकार.
सरकारी धोरणाने
होई कृषकाचे हाल,
त्याचे जीवावर डल्ला
मारणारे मालामाल.
अशी कशी झाली आज
कृषकाची ही दुर्दशा,
हतबल पोशिंद्याची
कधी पालटेल दशा.
दूर करण्या दारिद्र्य
बळीराजा जागृत हो,
दाम श्रमाचे मिळण्या
आता लढाया सज्ज हो.
सौ सुरेखा बोरकर
नागपूर
प्रतिक्रिया
छान लिहिले.
छान लिहिले.
पाने