नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*१.माणसाचा देव व्हावा*
जात धर्म पंथ बेगडी ते विचाराचा देव व्हावा
शोधतो का उगा दगडात माणसाचा देव व्हावा.
कष्टानेच सजवावी रावळे ती आपली आपण
आस का वरदानाची तुज कर्तृत्वाचा देव व्हावा.
गर्दी अफाट तूज भोवताली सुदामा तू एकटा
भासावी सावली कान्हा तिज सोबतीचा देव व्हावा.
कंटक या पथी शल्य अमाप जरी तव जीवनी
पाथेय तू अनामिक तूज अस्तित्वाचा देव व्हावा.
झुगारण्या जोखड सनातनी जरी सोसले वार
व्हावे समर्थ पुरोगामी तूज मुक्तिचा देव व्हावा.
- *प्रा. राजेंद्र गवळी*
कुकाणा ता. नेवासा जि. अहमदनगर
*