![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भेगाळल्या भुईला कर तृप्त पावसाने
वागू नको ढगा तू या माणसाप्रमाणे
नात्यात आपल्या ह्या सुरवात कर नव्याने
प्रिये समान तू ही सांगू नको बहाने
स्वीकारते तुला रे गर्जू नकोस नुसता
तक्रार मांडली ना मातीतल्या घराने
रानी वनी कुठेही नाही तुझा भरोसा
करणार मग कशाला हा मोर नाच गाणे
नेत्या समान तू ही आलाच ना भुईवर
येईल का कृषीतुन वर्षात चार दाने
त्या मेघगर्जनेचे हे भास पावसाळी
थेंबाविना करपले अंकूरले बियाणे
बदनाम तू जरीही करतो धरेस हिरवी
देशात वाळवंटी ये चोर पावलाने
भरण्यास ये सखींचे आहेत माठ रीते
रानातल्या नद्या ही विकल्यात शासकाने
चाले ह्रदय जगाचे, अन्नावरी कृषी च्या
पण भाव ना मिळेना पेट्रोलच्या दराने
केले फितूर जर का धिरज इथे ढगाला
ताटात भाकरी ह्या भिजतील आसवाने
प्रतिक्रिया
व्वाह धिरज भाऊ प्रत्येक शेर
व्वाह धिरज भाऊ प्रत्येक शेर एका पेक्षा एक सरस....
गहजब.....
Narendra Gandhare
धन्यवाद! गंधारे सर!!
खूप खूप आभार!!!!
खुपच छान धिरज सर.
खुपच छान धिरज सर.
धन्यवाद राजेश ़
आभार तुझे..
वागू नको ढगा तू या माणसाप्रमाणे.
अप्रतिम धिरजभाऊ
Narendra Gandhare
धन्यवाद! नरेंद्र भाऊ!!
धीर मिळाला, आनंद झाला. खूप आभार....
ताटात भाकरी ह्या भिजतील आसवाने.
क्या बात. बहुत बढ़िया धिरजभाऊ

Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद!
खूप खूप आभार डॉ. साहेब!!!!
खुपच सुंदर रचना धिरज साहेब
ताटात भाकरी ह्या भिजतील आसवाने
बहूत बढिया धिरज भाऊ
धन्यवाद!
धन्यवाद, प्रिय गांधीजी!!!
खुप छान रचना
सर जी आपण खुप छान गझल लीहली आहे...
"चाले ह्रदय जगाचे, अन्नावरी कृषी च्या
पण भाव ना मिळेना पेट्रोलच्या दराने"
खुप भावल्या ह्या ओळी
आभार, महेश भाऊ,!!
आभार, महेश....
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद सर!
पाने