नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

रीकामा झोरा केला

Dhirajkumar Taksande's picture
काव्यप्रकार: 
कविता

काळ्यालात काळ्यांनीच गोरा केला
ईमानदाराचा रिकामा झोरा केला

महफिलीत सजल्या किती स्वरधारा
जीवाचा मात्र आमच्या तंबोरा केला

लीवला इकास जीमीनीवर कितीदा
जुलमी पावसानं पुन्हा कोरा केला

सरकारं बदलली पर नशीबं नाही
सावकाराच्या सुइचा पुन्हा दोरा केला

Share
Layout Settings