Ramram नमस्कार !  Ramram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




माय मराठी स्तवन git

माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             - गंगाधर मुटे
........................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
........................


श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी  माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

 
  • गायक - विनायक वानखेडे
  • गीत- गंगाधर मुटे
  • बेन्जोवादक - देविदास बिजवार
  • तबलावादक - प्रविण खापरे
  • हार्मोनियम - सुरेश सायवाने
 
Ringtone Download
 
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.
 
वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB
 
 
 
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.
 
 
संपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी  येथे  क्लिक करा.

Share

Comments

  • अतिथी सदस्य's picture
    अतिथी सदस्य (not verified)
    Thu, 28/02/2013 - 00:34. वाजता प्रकाशित केले.

    In one word...
    ZAKKASSS

  • admin's picture
    admin
    Sun, 17/03/2013 - 23:23. वाजता प्रकाशित केले.
    Ringtone-Download

    "नमो मायबोली" ही रिंगटोन डाउनलोड करा.

    वेळ : ३२ सेकंद  - MP3    आकार - 1.22 MB

    रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी

    'डाऊनलोड रिंगटोन' यावर राईट क्लिक करा आणि save link as करा.
    नंतर OK select करा

    -------------------------------------------------------------------
  • admin's picture
    admin
    Thu, 27/02/2014 - 15:24. वाजता प्रकाशित केले.

    सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Fri, 26/02/2016 - 22:25. वाजता प्रकाशित केले.

    मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून जगभरातील मराठी भाषकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला होता.

    सर्वांना जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...!

    ************************

    शेतकरी तितुका एक एक!

  • Nilesh's picture
    Nilesh
    Mon, 07/03/2016 - 20:47. वाजता प्रकाशित केले.

    सुंदर

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 27/02/2018 - 07:05. वाजता प्रकाशित केले.

    मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

    शेतकरी तितुका एक एक!

  • Pages