४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेती-साहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्या समस्यांची मराठी साहित्य-विश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यविश्वाकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी ४ थे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता सारस्वतांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
तरी आपण अगत्याने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करण्यात सहकार्य करावे, ही आग्रहाची विनंती.
कार्यक्रमाची रुपरेषा
बुधवार, ३१ जानेवारी २०१८
सकाळी ०८.०० ते ०९.०० : अल्पोपहार व चहापान
सकाळी ०९.०० ते ०९.३० : प्रतिनिधी नोंदणी
सकाळी ०९.३० ते ०१२.०० : उद्घाटन सत्र
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत,
उद्घाटन आणि स्वागतसमारोह
संमेलनाध्यक्ष : मा. डॉ. विट्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक
उदघाटक : मा.मकरंद अनासपुरे, समाजसेवक आणि सिनेकलावंत
प्रमुख अतिथी : मा. सौ. सरोजताई काशीकर, माजी आमदार
विशेष अतिथी : मा. रामचंद्रबापू पाटील, ज्येष्ठ शेतकरी नेते
स्वागताध्यक्ष : मा. अभिजित फाळके, अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी
प्रास्ताविक : मा. श्री. गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
सूत्रसंचालन : मा. किशोर बळी, गझलकार आणि सिनेकलावंत
सत्र - २ : १२.०० ते ०१.४५ : शेतकरी कवी संमेलन
अध्यक्ष : विजय विल्हेकर (अमरावती)
सूत्रसंचालन : प्रा. वृषाली विनायक (मुंबई)
सहभाग : किशोर बळी, श्याम ठक, सुनील अढाऊकर, श्री हिंमतराव ढाले (अकोला), दिलीप भोयर (अमरावती), अरविंद हंगरगेकर (उस्मानाबाद), अशोक गायकवाड (औरंगाबाद), रत्नाकर चटप, किशोर कवठे (चंद्रपूर), राजीव जावळे, ओंकार खांडेभराड (जालना), रावसाहेब कुवर (धुळे), प्रा.चित्रा कहाते (नागपूर), रवींद्र दळवी (नाशिक), संदीप गुजराथी (नासिक), मधुकर तराळे, विणा माच्छी (पालघर), विनिता माने-पिसाळ, रविंद्र कामठे (पुणे), लक्ष्मण लाड, सिद्धेश्वर इंगोले, केशव कुकडे, प्रज्ञा आपेगावकर (बीड), विशाल इंगोले (बुलडाणा), साहेबराव ठाणगे (मुंबई), लक्ष्मी बलकी (यवतमाळ), ईश्वरचंद्र हलगरे (रत्नागिरी), प्रदीप थूल, राजेश जौंजाळ, धीरजकुमार ताकसांडे, रविपाल भारशंकर, सुशांत बाराहाते, रंगनाथ तालवटकर, नारायणराव निखाते (वर्धा), चाफेश्वर गांगवे (वाशीम), संग्राम अनपट (सातारा)
दुपारी ०१.४५ ते ०२.१५ : मध्यावकाश (स्नेहभोजन)
सत्र - ३ : दुपारी ०२.१५ ते ०३.३० : परिसंवाद – १
विषय : आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्वामिनाथन आयोग
अध्यक्ष : मा. श्री गुणवंत पाटील (नांदेड)
सहभाग : मा. अजित नरदे (कोल्हापूर), मा. संजय कोले (सांगली) मा. ललित बहाळे (अकोला), मा. विजय निवल (यवतमाळ), मा. सतीश दाणी (वर्धा)
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. सिमा नरोडे (पुणे)
सत्र - ४ : दुपारी ०३.३० ते ०४.४५ : परिसंवाद – २
विषय - आलं वरिस राबूनं, आम्ही मरावं किती?
अध्यक्ष : मा. सौ. शैलजा देशपांडे (वर्धा)
सहभाग : मा. सौ. प्रज्ञा बापट (यवतमाळ), मा. सौ. स्मिता गुरव
(नासिक), मा. सौ. गीता खांडेभराड (जालना),
कु.प्रिया लोडम (मुंबई)
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. प्रा. मनिषा रिठे
सायं ०४.४५ ते ०५.०० : मध्यावकाश (चहापान)
सत्र - ५ : सायं ०५.०० ते ०६.३० : शेतकरी गझल मुशायरा
अध्यक्ष : मा. प्रशांत वैद्य (मुंबई)
सूत्रसंचालन : मा. अनंत नांदुरकर (नागपूर)
सहभाग : प्रवीण हटकर (अकोला), नितीन देशमुख (अमरावती), ईश्वर मते (गडचिरोली), रामकृष्ण रोगे, रवी धारणे, प्रदीप देशमुख (चंद्रपूर), रमेश सरकाटे (जळगाव), वीरेंद्र बेडसे (धुळे), विजय पाटील (नंदुरबार), अझीझखान पठाण (नागपूर), नजीमखान (बुलडाणा), विशाल राजगुरू, प्रा. प्रतिभा सराफ, एजाज शेख, जनार्दन म्हात्रे (मुंबई), सिद्धार्थ भगत (यवतमाळ), गंगाधर मुटे (वर्धा), हंसिनी उचित (वाशीम), बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर)
सत्र - ६ : सायं ०६.३० ते ०८.०० : परिसंवाद – ३
विषय - शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल
अध्यक्ष : मा. अॅड दिनेश शर्मा, (वर्धा)
सहभाग : मा. अॅड प्रकाशसिंह पाटील, (औरंगाबाद)
: मा. अॅड सतीश बोरुळकर, (मुंबई)
प्रास्ताविक व सूत्रसंचालन : मा. मधुसुदन हरणे, (हिंगणघाट)
रात्री ०८.०० ते १०.०० :
समारोपीय सत्र आणि पुरस्कार वितरण
विषय - चला पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली
अध्यक्ष : मा. अॅड. वामनराव चटप, शेतकरी नेते
सहभाग : मा. श्री अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना
: मा. श्री कडुआप्पा पाटील, जळगाव
: मा. राजूभाऊ पुजदेकर, अमरावती
: मा. अभिमन्यू शेलार, पुणे
रात्री १०.०० ते १०.३० : स्नेहभोजन
*******
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
*************
प्रतिक्रिया
शेतकरी संमेलन
खूपच छान
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
खुप छान
सुंदर आहे
अप्रतिम आयोजन.. सुधाकर गायकी
अप्रतिम आयोजन..
सुधाकर गायकी
मराठी शेतकरी साहित्य
मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचे विशेषतः त्यांच्या सहभागाचे फोटो मिळावेत अशी सहभागी प्रतिनिधींची अपेक्षा असते. पण प्रत्येकाचे फोटो निवडून त्यांना इमेल अथवा व्हाटसपने पाठवणे मला शक्य होत नाही. त्यामुळेच पहिल्या आणि दुसर्या संमेलनाचे फोटो पाठवायचे राहून गेले होते.
आता आपण तुम्हाला हवे ते फोटो डाऊनलोड करुन घेऊ शकता. पद्धतही फार सोपी आहे.
डेस्कटॉपसाठी :
फोटोवर राईट क्लिक करुन Save Image as वर क्लिक करा.
मोबाईलसाठी :
फोटोवर 3 सेकंद बोट ठेवले की बाजूला एका चौकटीत विकल्प दिसतात. त्यातील Save Image हा पर्याय निवडावा.
आशा आहे की हा पर्याय सर्वांना सोईचा आणि उपयुक्त ठरेल.
शेतकरी तितुका एक एक!
फोटो उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद सर!
Dr. Ravipal Bharshankar
(विषय दिलेला नाही)
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण