नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अन्तेष्ट्य सोहळा
आभाळ वाट पाही पाहे तशी धराही
दर्या तुडुंबलेला बाहेर थेंब नाही
काळीज जाळणारी हा सूर्य आग ओकी
गेले तडे भुईला घामास वाव नाही
जे ठेवले बियाणे दाणे म्हणून झाले
निष्पाप पाखरांचे तेही नशीब नाही
हाडे जिवंत सारी घे झूल कातडीची
झोळीत आतडीच्या काडी मुळीच नाही
आला उधाणवारा माती गुलाल झाली
या साजरा करू हा अन्तेष्ट्य सोहळाही
विजय नांगरे
मु. पो. चांदा, ता. नेवासा,
जि. अहमदनगर ४१४६०६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने