नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय - आंतरजाल लेखन स्पर्धा २०१६
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१६
विभाग :अ) पद्यकविता
|| लयच झालं आता ||
सोसून तुह्य भाऊ लयच झालं आता
फेक गयांतला दोर प्रश्न इचार आता
तुलेच शोधा लागण तूह्यवाल अभाय
ग्रह तारे तूह्ये अन तुहीच नयी सकाय
फाडून टाक पंचागाले, फेकून दे आता
येतो म्हणून गेला देऊन निस्त्या तारखा
वाट नको पाहू होऊन येड्या सारखा
मार ढगाले गोटा, नेम धरून आता
नोंद नायी तुही इच्ची येवस्ता कधी घेते
मतांसाठी तुले निस्त वापरून घेते
नाव तुह्य अभायात,घे कोरून आता
राज्याले त तुह्या कवाच गाळळ पातायात
सरकार तुले कांडते, येवस्तेच्या उखयात
तूच हाये तुह्या राजा, दे सांगून आता
तूच खरा भूमिपुत्र सांगते इच्ची माती
तरी तुह्या हाती देते भिकाऱ्यांची वाटी
इंग्रजांच्या अवलादीला,हाकलून दे आता
भेटणार कसा नायी तुले हमीभाव यंदा
बंद करून टाका म्हणा दलालीचा धंदा
मागू नको भीक तू ,हिसकून घे आता
तपासून पाह्य तू जमान्याचा इतिहास
जिकल नायी कोणी घिऊन गयात फास
सुटणार नायी प्रश्न, इथं मरून आता
रवींद अंबादास दळवी
3 श्याम रेसिडेन्सी
रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ
डीजीपी नगर नाशिक 422006
मो. नं.9423622615
ई-मेल :- ravidalvi7@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने